---Advertisement---

INDvsENG: ‘त्याने’ माझ्यात आत्मविश्वास भरला, म्हणून मी शतक झळकावले; आर अश्विनचे वक्तव्य

On: रविवार, मार्च 7, 2021 3:44 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने या मालिकेत ३-१ अशी सरशी साधली. भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन या मालिकेत मालिकावीर ठरला. मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर अश्विनला आपला सहकारी रवींद्र जडेजाची आठवण आली.

अश्विनने पटकावला मालिकावीर पुरस्कार
रविचंद्रन अश्विनने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांची मने जिंकली. अश्विनने या मालिकेत इंग्लिश फलंदाजांना जखडून ठेवत ३२ बळी आपल्या नावे केले. सोबतच, चेन्नई येथील दुसऱ्या कसोटीत शतक झळकावत त्याने आपल्या फलंदाजीचे कौशल्य सर्वांना दाखवले. त्याच्या या कामगिरीमुळे मालिकावीर पुरस्कार त्याला देण्यात आला.

अश्विनला आली जडेजाची आठवण
रविचंद्रन अश्विनने चौथ्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या दरम्यान त्याला आपला सहकारी रविंद्र जडेजाची देखील आठवण आली.

अश्विन म्हणाला,”आम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचलो आहोत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. ही मालिका कमालीची होती. त्यामध्ये मला भरपूर काही शिकण्यास मिळाले. चेन्नई कसोटीत झळकावलेले शतक कायम स्मरणात राहील. मला आनंद आहे की, मी माझ्या फलंदाजीला न्याय देऊ शकलो. मला जडेजा आणि विराटने आत्मविश्वास दिला आणि त्यामुळे मी अशी फलंदाजी करू शकलो.”

अंगठ्याच्या दुखापतीमुळे सध्या अष्टपैलू रवींद्र जडेजा भारतीय संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी२० मालिकेत त्यालाही दुखापत झाली होती.

अश्विनने मिळवला आठव्यांदा मालिकावीर पुरस्कार
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मालिकावीर जिंकल्यानंतर अश्विनन भारतातर्फे सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू बनला आहे. त्याचा हा आठवा मालिकावीर पुरस्कार आहे. त्याच्यापुढे श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (११) व जॅक कॅलिस (९) यांचा क्रमांक लागतो. अश्विनने वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी दोन वेळा तर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड विरुद्ध एक-एक वेळा मालिकावीर पुरस्कार आपल्या नावे केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल पुन्हा एकदा विनाप्रेक्षक, पाहा बीसीसीआयने काय घेतला निर्णय?

“गेल्या दोन वर्षात विराटने हार मानली नाही, म्हणून कसोटी चॅम्पियनशीप..,” राहुलने केला खुलासा

“रोहित शर्माला वर्ल्ड कप उंचावताना पाहायचे आहे”, संघ सहकाऱ्याने व्यक्त केली इच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---