इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यादरम्यान ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता; तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. ही मालिका आता १-१ च्या बरोबरीत आहे.
त्यामुळे भारतीय संघाला ही मालिका जिंकायची असेल तर २ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागेल. दरम्यान चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात.
या मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २ सप्टेंबरपासून ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल पाहायला मिळू शकतात. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. परंतु तो आता पूर्णपणे फिट असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आर अश्विनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आर अश्विन भारतीय संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. परंतु मालिकेतील पहिल्या ३ कसोटी सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाली नाहीये. त्याने शेवटचा सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला होता. या सामन्यात त्याने ३ गडी बाद केले होते. तर काउंटी क्रिकेटमध्ये सर्रे संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ६ गडी बाद केले होते. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतकांची नोंद आहे. त्यामुळे तो फलंदाजी करण्यास देखील सक्षम आहे. अशात संघ त्याला खेळवण्याचा विचार करू शकते.
तर ईशांत शर्माने लीड्स कसोटी सामन्यात २२ षटक गोलंदाजी करत ९२ धावा खर्च केल्या होत्या. यादरम्यान त्याला एकही गडी बाद करता आला होता. तसेच विराटने संकेत देखील दिले होते की, चौथ्या कसोटी सामन्यात एका वेगवान गोलंदाजाला विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे ईशांत शर्मा ऐवजी शार्दुल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते.
शार्दुल ठाकूर देखील चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एकूण ४ गडी बाद केले होते. तसेच शार्दुल ठाकूर देखील फलंदाजी करण्यास सक्षम आहे. त्यामुळे आर अश्विन आणि शार्दुल ठाकूर यांनी जर संघात पुनरागमन केले तर भारतीय संघातील फलंदाजीची खोली वाढेल.(Ashwin shardul thakur will return in oval test against England)
अशी असू शकते भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन किंवा रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
आयर्लंडचा टी२०त इतिहास, एकाच आठवड्यात २ शतके ठोकत केला कोणालाही न जमलेला किर्तीमान
ना ना…! कोहली आणि संघाला कमी लेखण्याची चूक करू नका; शास्त्रींची इंग्लंडला चेतावणी
अश्विनच्या सहभागाच्या अंदाजानेच इंग्लंडचा उडालाय थरकाप, ओव्हलच्या खेळपट्टीशी करणार छेडछाड!