राजकोटमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. तर टेस्ट मॅचच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाला झटका बसला होता. कारण रविचंद्रन अश्विनने सामन्यातून अचानक माघार घेतली होती. तसेच कौटुंबिक इमर्जन्सीमुळे अश्विनला घरी जावं लागलं होतं. मात्र ऑफस्पिनर आर अश्विन इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी राजकोटमध्ये भारतीय संघात येणार आहे. असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
🚨 UPDATE 🚨: R Ashwin set to rejoin #TeamIndia from Day 4 of the 3rd India-England Test.#INDvENG | @IDFCFIRSTBankhttps://t.co/rU4Bskzqig
— BCCI (@BCCI) February 18, 2024
याबरोबरच बीसीसीआय म्हंटले आहे की”भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे थोड्याशा अनुपस्थितीनंतर आर अश्विनचे संघात पुनरागमन करण्याची घोषणा केला आहे. तसेच पुढे बोलताना बीसीसीआय म्हंटले आहे की “आर अश्विन आणि संघ व्यवस्थापन दोघांनाही पुष्टी करताना तो चौथ्या दिवशी पुन्हा मैदानात उतरेल आणि चालू असलेल्या कसोटी सामन्यात संघासाठी योगदान देत राहील.”
रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन ही टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 1 बळी घेत कसोटी क्रिकेटमधील 500 बळी पूर्ण केले. तो भारतासाठी सर्वात वेगवान 500 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 98 कसोटी सामन्यांमध्ये 500 बळी घेतले आहेत. ज्यामध्ये 34 वेळा 5 विकेट्सचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : यशस्वी राजकोट कसोटीत पुन्हा करणार फलंदाजी? घ्या जाणून ICC चा नियम
- IND vs ENG । ‘अरे आपल्यासोबत ‘ते’ होईल’, रोहितचं बोलणं ऐकून तुम्हालाही पडेल प्रश्न, मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल