fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले

रशिद खान हा अफगाणिस्तानचा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्याने अनेक देशांतील  टी-20 स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग सगळीकडे आहे.

एशिया कप स्पर्धा आता उत्तरार्धाकडे झुकली आहे तशी उत्कंठा शिगेला पोहचत पोहचली आहे. 21 सप्टेंबरला झालेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामन्यात शेवटच्या षटकात पाकिस्तानने आपला अनुभव पणाला लावत विजय मिळवला.

बांग्लादेशाला आणि श्रीलंकेला हरवल्या नंतर त्यांनी पाकिस्तानला चांगलेच दमवले. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी शाहिदी 97 आणि कर्णधार असघर अफघान 67 यांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तान समोर 257  धावांचे आव्हान ठेवले होते.

या सामन्यात गोलंदाजी करताना अफगानिस्तानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खानने  46 धावात पाकिस्तानचे 3 गडी बाद केले. तरीही संघाला पराभवापासून वाचू शकला नव्हता . त्याने सामन्यात पाकिस्तानचे फलंदाज असिफ अली आणि मोहम्मद नवाज यांना बाद केेल्यानंतर त्यांना जाण्याचा इशारा केला होता.

त्याच्या या मग्रूर वर्तनावर पाकिस्तानचे चाहते नाराज झाले आहेत. त्यांनी ट्विटर वर त्याच्यावर  नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर

-रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जगातील सर्वात विध्वंसक जोडी

-एशिया कप २०१८: टीम इंडियासमोर अनपेक्षित पाकिस्तानचे कडवे आव्हान

You might also like