---Advertisement---

‘आमच्याकडे हार्दिक पांड्या असता तर…’, पाकिस्तानच्या दिग्गजाने केली खंत व्यक्त

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 5:04 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी २०२२ वर्ष उत्तम ठरत आहे. त्याने दुखापतीनंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने बॅट आणि बॉल दोन्हीने मैदाने गाजवणारी खेळी केली. त्याचा हा फॉर्म सध्या कायम असून तो पुढील स्पर्धामध्ये भारतासाठी महत्वाची भुमिका पाडू शकतो. २७ ऑगस्टपासून एशिया कपच्या (Asia Cup) संग्रामाला सुरवात होत आहे. यामध्ये भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना २८ ऑगस्टला दुबई येथे खेळला जाणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने खंत व्यक्त केली आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आकिब जावेद (Aaqib Javed) याने म्हटले भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा मोठा फरक निर्माण करू शकतो. मागील वर्षी झालेल्या टी२० विश्वचषकानंतर हे दोन्ही संघ आता समोरा-समोर येत आहेत.

जावेदने पाक टीव्हीशी संवाद साधताना म्हटले, “दोन्ही संघातील अंतर त्यांची फलंदाजी आहे. भारताची फलंदाजी आजही सर्वाधिक अनुभवी आहे. जर रोहित शर्माची बॅट तळपली तर भारत एकतर्फी सामना जिंकू शकतो. तसेच फखर जमानच्या बाबतीत आहे. त्यानेही चांगली खेळी केली तर पाकिस्तानच्या जिंकण्याची शक्यता आहे. मात्र भारताच्या आणि पाकिस्तानच्या मधल्या फळीत फारच अंतर आहे. त्यासोबतच अष्टपैलू खेळाडूही त्यामध्ये अंतर निर्माण करू शकतात. कारण पाकिस्तानकडे हार्दिक पांड्यासारखा अष्टपैलू नाही. जो एशिया कपमध्ये महत्वाची भुमिका पार पाडू शकतो.”

टी२० विश्वचषक २०२१ आणि हार्दिक आणि भारताचा पराभव

मागील वर्षी दुबई येथे झालेल्या टी२० विश्वचषकातील भारतीय संघात हार्दिकचा समावेश होता. तरीही भारताला साखळी फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते. त्या स्पर्धेत भारताला सहाव्या गोलंदाजांची उणीव भासली होती. कारण हार्दिकने फक्त फलंदाजीच केली होती. त्यानंतर तो स्वत भारतीय संघाकडून खेळण्यासाठी काही काळ उपलब्ध नव्हता. तर आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना संघाला पदार्पणातच विजेतेपद जिंकून दिले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

झिम्बाब्वेचा धुव्वा उडवायला पोहोचलाय भारतीय संघ! पाहा व्हिडिओ

Asia Cup 2022: रोहित करणार धोनीची बरोबरी! बाबरकडे आफ्रिदी आणि इंजमामला मागे टाकण्याची संधी

ZIMvsIND: राहुलने गाजवलेलं झिम्बाब्वेविरुद्धच पदार्पण, आता कॅप्टन म्हणून मिळवणार पहिला विजय?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---