आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेचा 15वा हंगाम चांगलाच रोमांचक होत आहे. 2018नंतर ही स्पर्धा खेळण्यात आल्याने काही संघांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्यातच सुपर फोरचे सामने सुरू असल्याने संघामध्ये जिंकण्याची चढाओढ सुरू आहे. यामुळे वातावरही तापले असून मैदानातील स्थितीही दबावात्मक आहे. अशा स्थितीत पाकिस्तानने रविवारी (4 सप्टेंबर) भारताचा सुपर फोरच्या सामन्यात 5 विकेट्ने पराभव केला आहे. यामध्ये अर्शदीप सिंग हा भारताचा युवा गोलंदाज सोशल मीडियावर सगळ्यांच्या टिकांचे निशाना ठरला आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. भारताने विराट कोहली (Virat Kohli) याच्या 60 धावांच्या जोरावर 20 षटकात 7 विकेट्स गमावत 181 धावसंख्या उभारली. तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानची सुरूवात अडखळत झाली. भारताचा फिरकीपटू रवी बिश्नाई याने पाकिस्तानचा कर्णधार-सलामीवीर बाबर आझम (Babar Azam) याला 14 धावांवर बाद करत विरोधी संघाला पहिला धक्का दिला. मात्र मोहम्मद रिजवान आणि मोहम्मद नवाज यांनी तिसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. रिजवानला हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने 71व्या धावांवर असताना बाद केले असले तरी 18व्या षटकात जे घडले त्यामुळे अर्शदीप सिंग याला पराभवास कारणीभूत ठरवले जात आहे.
नेमके काय घडले 18व्या षटकात
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने 18व्या षटकात रवि बिश्नोईच्या चेंडूवर आसिफ अली याचा झेल सोडला. पाकिस्तानच्या या फिनिशरने तेव्हा एकही धाव केली नव्हती. तर या जीवनदानाचा फायदा घेत त्याने 8 चेंडूवर 16 धावा करत संघाचा विजय जवळपास पक्का केला. तर हा झेल सोडल्यापासूनच अर्शदीपला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. काही पोस्टमध्ये त्याला ‘खलिस्तानी’ असे संबोधले जात आहे.
अर्शदीपला खलिस्तानी म्हणणारे अकाउंट पाकिस्तानी?
सोशल मीडिया एक्टिविस्ट अंशुल सक्सेना याने एकामागोमाग ट्वीट करत अर्शदीपला खलिस्तानी म्हणणारे अकाउंट पाकिस्तानी? असा दावा केला आहे. याबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणात स्क्रीनशॉटही शेयर केले आहेत. नवाब नावाच्या पाकिस्तानी अकाउंटने लिहिले, देशद्रोही आहे हा, बाहेर काढा त्याला, पाकिस्तानच्या पंजाबमध्ये पाठला त्याला. तर दुसरीकडे पाकिस्तानचा पत्रकार डब्ल्यू ए खान याने लिहिले, अर्शदीप हा पाकिस्तानद्वारे समर्थन केलेल्या खलिस्तान आंदोलनाचा भाग आहे.
https://twitter.com/AskAnshul/status/1566501414800867328?s=20&t=kJeA9AwrB9o54tmBS6iCuw
https://twitter.com/AskAnshul/status/1566505154358439936?s=20&t=kJeA9AwrB9o54tmBS6iCuw
खराब गोलंदाजी ठरली भारताचा कर्दनकाळ
भारताचे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे दुखापतीतून सावरत आहेत. तर रविंद्र जडेजाही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. आवेश खान हा पण आजारी होता. त्यातच सुपर फोरमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार याने 19व्या षटकात 19 धावा दिल्या. अशी स्थिती असताना अर्शदीपला शेवटच्या षटकात 7 धावा डिफेंड करता आल्या नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान विरुद्धच्या पराभवामागचे कारण कॅप्टन रोहितने केले स्पष्ट; म्हणाला, ‘हार्दिक आणि पंतच्या विकेट…’
ज्याने हरवले, तोच मदतीला धावणार; भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी पाकिस्तानची होणार हेल्प!!
पाकिस्तानचा रडीचा डाव! ‘360 डिग्री’ सूर्यकुमारला उगाच डिवचलं, स्लेजिंगचा व्हिडिओ व्हायरल






