---Advertisement---

अरे, नक्की चाललंय तरी काय! एशिया कपसाठी आवेश इन, शमी आउट; फॅन्स भडकले निवडकर्त्यांवर

Mohammed Shami & Avesh Khan
---Advertisement---

भारतीय क्रिकेट चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते त्या एशिया कप (Asia Cup) या स्पर्धेसाठी भारताचा संघ सोमवारी (८ ऑगस्ट) जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत भारत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, तर उपकर्णधार म्हणून केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. 

विराट कोहली (Virat Kohli) याचे संघात पुनरागमन झाले आहे, तर जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे एशिया कपसाठी मुकला आहे. मोठी बाब म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याच्याकडे दुर्लक्ष करत निवडकर्त्यांनी आवेश खान याला संधी दिली आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काहींनी तर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे ट्विटरवर शमीला संघातून का वगळले गेले, या ट्वीट्सचा धुमाकूळ सुरू आहे.

ऑगस्ट २७ पासून सुरू होणाऱ्या एशिया कपचे स्वरूप टी२० प्रकारातील आहे. २०१६नंतर प्रथमच एशिया कप टी२० प्रकारात खेळला जाणार आहे. भारतीय संघाचा या स्पर्धेतील पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध २८ ऑगस्ट आहे. हे सामने दुबई येथे खेळले जाणार आहे. तर भारतीय संघासाठी रोहित शर्मा आणि केएल राहुल हे अनुक्रमे कर्णधार आणि उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणार आहे.

भारतीय संघाच्या या १५ जणांमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या दीपक हुड्डा, अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांना संधी दिली आहे. तसेच श्रेयस अय्यर, दीपक चाहर व अक्षर पटेल हे राखीव खेळाडू संघात असतील. बुमराहबरोबरच हर्षल पटेलही दुखापतीमुळे या स्पर्धेस मुकला आहे.

आशिया चषकासाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

नशीबचं फुटके! चांगल्या प्रदर्शनानंतरही आशिया चषकातून बाहेर झाले ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर

आशिया चषकाचा संघ समोर आल्यानंतर टी-२० विश्वचषकाचे चित्र स्पष्ट? वाचा कसा असेल संघ

पत्नीच्या यशाने कार्तिक इमोशनल, ब्रॉन्ज मेडल विजयानंतर ‘या’ शब्दांत केला कौतुकाचा वर्षाव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---