---Advertisement---

काय सांगता ! एशिया कपसाठी पाकिस्तानच्या दिग्गजाने भारतीय संघातून थेट ‘या’ स्टार खेळाडूलाच वगळले

On: शनिवार, ऑगस्ट 6, 2022 7:06 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सलामीवीर केएल राहुलच्या संघात नसण्याने अनेक सलामीवीर जोड्यांचा प्रयोग करू पाहत आहे. भारताने आतापर्यंत सहा ते सात फलंदाजांना सलामीवीर म्हणून खेळवले आहे. राहुल झिम्बाब्वेच्या दौऱ्यात तो संघपुनरागमन करेल अशी चर्चा होत होती, मात्र पुन्हा एकदा त्याच्या दुखापतीने तोंड वर काढल्याने तो या दौऱ्याला मुकला आहे. तो आता थेट एशिया कपसाठी संघात येणार अशी अपेक्षा असताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने राहुलबद्दल आश्चर्यकारक विधान केले आहे.

भारताचा स्टार सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) हा दुखापतीमुळे अनेक सामन्यांना मुकला आहे. तो घरच्या मैदानावर जुन महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळला नाही. तसेच इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यालाही तो मुकला. यामुळे त्याला क्रिकेट खेळून फार काळ झाला आहे. अशातच त्याला एशिया कपसारख्या मोठ्या आणि महत्वाच्या स्पर्धेत खेळवणे बरोबर नाही, असे पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने म्हटले आहे.

“एशिया कपसाठी मी राहुलला थेट संघात घेणार नाही. जर त्याला संघात घेतले तर त्याचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करेल,” असे कनेरियाने म्हटले आहे.

राहुलला संघात का घेतले नाही पाहिजे याचे कनेरियाने त्याच्या यू-ट्यूब चॅनलवर स्पष्टीकरण दिले आहे. कनेरियाने म्हटले, “सद्य परिस्थिती पाहता त्याच्याकडे क्रिकेट खेळण्याचा सराव नाही. यामुळेच त्याला संघात घेता येणार नाही. तसेच मोठ्या ब्रेकनंंतर त्याला टी२० खेळवणे योग्य नाही. त्याला टी२० विश्वचषकापर्यंत वेळ द्यायला हवा.”

एशिया कप या स्पर्धेची सुरूवात २७ ऑगस्टला होणार आहे. दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना २८ ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. भारताने मागील हंगाम रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळताना जिंकला होता. भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. भारताने मागील हंगामात पाकिस्तानला दोन वेळा पराभूत केले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

इंग्लंडला बगल देत टीम इंडियाने गाठली फायनल! स्म्रीतीचे अर्धशतक तर गोलंदाजीत ‘या’ खेळाडूने दाखवले कसब

टी२० विश्वचषकाच्या तयारीवरून दिनेश कार्तिकचे बडे बोल! म्हणाला, ‘भारताला…’

‘तुम्ही तुमचं बघा!’, सुनील गावसकरांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडवर साधलाय निशाणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---