आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (SLvsPAK) यांच्यात खेळला जात आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळला जात आहे. हा सामन्याला सांयकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान संघात शादाब खान आणि नसीम शाह परतले आहेत, तर उस्मान कादीर आणि हसन बाहेर झाले आहेत. तसेच श्रीलंका संघाचे त्यांचे सुपर फोरमधील सर्व सामने लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकले आहेत. अंतिम सामन्यात आता त्यांची कसोटी लागणार आहे.
पाकिस्तानची फलंदाजी मागील दोन सामन्यात थोडी अडखळताना दिसली आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात नसीम शाह याने लागोपाठ दोन षटकार मारल्याने पाकिस्तानने तो सामना जिंकला होता. त्याचबरोबर 2014च्या आशिया चषकातील अंतिम सामन्यात हे दोन संघ एकमेंकासमोर आले होते. तेव्हा बाजी श्रीलंकेने मारली होती. तो सामना श्रीलंकेने 5 विकेट्सने जिंकला होता.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
Unchanged.
Our 11 to battle for #AsiaCup glory tonight.👊#RoaringForGlory #SLvPAK pic.twitter.com/MtUkTnyC96— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 11, 2022
श्रीलंका – पाथुम निसांका, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), दानुष्का गुनाथिलका, धनंजया डी सिल्वा, भानुका राजपक्षे, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशान, महिश तिक्षाना, दिलशान मदुशंका.
Our team for the final 👊#AsiaCup2022 | #SLvPAK pic.twitter.com/NAlw3PH6sZ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 11, 2022
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, हरिस रउफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या 9 विकेट्सच्या विजयामागे आहे ‘हे’ कारण; हरमनप्रीत म्हणाली, ‘परिस्थितीच अशी होती की…’
फिंचला विजयी निरोप! न्यूझीलंडला व्हाईटवॉश देत ऑस्ट्रेलियाचा मालिकेवर कब्जा
षटकार ठोकल्यावर स्मिथने केलेल्या कृतीने सारेच झाले चकीत; पाहा व्हिडिओ