---Advertisement---

इंग्लंडच्या 9 विकेट्सच्या विजयामागे आहे ‘हे’ कारण; हरमनप्रीत म्हणाली, ‘परिस्थितीच अशी होती की…’

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 6:39 PM
harmanpreet kaur
---Advertisement---

भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याठिकाणी उभय संघात तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेचा पहिला सामना शनिवारी 10 सप्टेंबर रोजी खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात यजमान इंग्लंडकडून 9 विकेट्सने मोठा पराभव मिळाला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने पराभवासाठी मैदानातील परिस्थितीला कारणीभूत ठरवले. हरमनप्रीतच्या मते मैदान ओले असल्यामुळे खेळाडूंना दुखापत होण्याची दाट शक्यता होती आणि तसे झाले देखील. 

टी-20 मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) म्हणाली की, “आम्ही अपेक्षित धावा करू शकलो नाही. मला वाटते की, परिस्थिती खेळण्यासाठी अनुकूल नव्हती. आम्हाला अशा परिस्थितीत इच्छा नसताना खेळावे लागले. खेळाडूंनी ज्या पद्धतीने प्रयत्न केले, त्यासाठी खुश आहे. कारण दुखापत होण्याची शक्यता होती, पण तरीही त्या सर्वजणी खेळायला तयार होत्या. तुम्हाला संघात अशाच खेळाडू हव्या असतात, ज्या कोणत्याही परिस्थितीत धावा करण्यासाठी तयार असतील आणि आम्ही पूर्ण प्रयत्न केला, याचा आनंद आहे.”

दरम्यान इंग्लंडच्या डावातील दुसऱ्या षटकात भारताची फिरकी गोलंदाज राधा यादवला दुखापत झाली आणि ती या सामन्यात गोलंदाजी करू शकली नाही. हरमनप्रीत कौर म्हणाली की, “आमची एक खेळाडू दुखापतग्रस्त झाली होती आणि ती आमची मुख्य गोलंदाज होती. आम्हाली तिची कमी जाणवली. आमच्याकडे एक गोलंदाज कमी होती, तरीही आम्ही आव्हान दिले. मला माहिती होते की, परिस्थिती खेळण्यासाठी 100 टक्के चांगली नाहीये. पण तरीही आम्ही प्रयत्न केले. मला माहिती होते की, मैदान खूप ओले आहे आणि दुखापत होण्याची शक्यता आहे.”

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेला भारतीय संघ 20 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 132 धावा करू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडने मात्र धुवाधार खेळी केली. त्यांनी अवघ्या 13 एक विकेटच्या नुकसानावर हे लक्ष्य गाठले. सलामीवीर फलंदाज सोफिया डंकले हिने नाबाद 61 धावांची खेळी केली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

Asia Cup 2022: पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी श्रीलंकेने कसली कंबर; कॅप्टन शनाका म्हणाला, ‘टॉस हरलो तरी…’
षटकार ठोकल्यावर स्मिथने केलेल्या कृतीने सारेच झाले चकीत; पाहा व्हिडिओ
आशिया चषकात का शांत आहे बाबर आझमची बॅट? खुद्द प्रशिक्षकांनीच सांगितलेय कारण  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---