पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात रविवारी (11 सप्टेंबर) आशिया चषक 2022 चा अंतिम सामना रंगणार आहे. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. श्रीलंकेची नजर हा सामना जिंकत सहाव्यांदा आशिया चषक जिंकण्यावर असेल. तर पाकिस्तानचा संघ तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
- 1986 मध्ये आशिया चषकाच्या दुसऱ्या हंगामातील अंतिम सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान संघ आमने सामने होते. या सामन्यात श्रीलंकेने 5 विकेट्सने विजय मिळवला होता.
- त्यानंतर 2000 साली दुसऱ्यांदा उभय संघ अंतिम सामन्यात एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. यावेळी पाकिस्तानने मागील पराभवाचा वचपा काढत श्रीलंकेला 39 धावांनी पराभूत करत विजेतेपद जिंकले होते. हे पाकिस्तानचे पहिलेवहिले जेतेपदही होते.
- 2014 मध्ये तिसऱ्यांदा श्रीलंका आणि पाकिस्तान संघात आशिया चषकाचा अंतिम सामना झाला होता. यावेळी श्रीलंकेने 5 विकेट्सने विजय मिळवला होता.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका अंतिम सामन्याबद्दल सविस्तर माहिती
सामना: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
तारीख आणि वेळ: रविवार 11 सप्टेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता
स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स / डीडी स्पोर्ट्सवर भारतात लाईव्ह सामना पाहता येईल. डिझ्नी हॉटस्टारद्वारे मोबाईलवर लाइव्ह स्ट्रिमिंग होईल
पाकिस्तान आणि श्रीलंकाचे संपूर्ण संघ-
पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हारिस रउफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, उस्मान कादिर, हैदर अली, हसन अली , शाहनवाज दहानी
श्रीलंकेचा संघ: पथुम निसांका, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), दनुष्का गुनाथिलका, धनंजया डी सिल्वा, भानुका राजपक्षे, दासुन शनाका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, प्रमोद मदुशन, महेश थेक्षाना, दिलशान मदुशन्का, वानूश चंदरे, वानंदे चंदरे. चारिथ असलंका, असिथा फर्नांडो, अशेन बंदारा, प्रवीण जयविक्रमा, नुवानिडू फर्नांडो, मथीशा पाथिराना, नुवान तुषारा
पाकिस्तान आणि श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
पाकिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन: मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, आसिफ अली, खुशदिल शाह, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन
श्रीलंका संभाव्य प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), चरिथ अस्लांका, दनुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, माहिश थिक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मधुशंका
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फायनल | पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होतील ‘हे’ 2 बदल, तर श्रीलंकाही उतरवेल तगडा संघ
स्वतंत्र भारताचे पहिले कर्णधार लाला अमरनाथ यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 साठी किती असणार युवी-भज्जीच्या स्टॅन्डमधील तिकीटाची किंमत?