रविवारी (11 सप्टेंबर) आशिया चषक 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. उभय संघातील हा सामना खूपच रोमांचक झाला आणि श्रीलंकन संघाने 23 धावांनी विजय मिळवून आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. ही सहावी वेळ आहे, जेव्हा श्रीलंका संघाने ही ट्रॉफी जिंकली आहे. पाकिस्तानचे प्रदर्शन पाहता त्यांना विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते, परंतु श्रीलंकेने अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन करून बाजी मारली. त्यांच्या संघात दोन खेळाडू होते, ज्यांना अनुक्रमे सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.
श्रीलंकेला त्याची सहावी आशिया चषक ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) याने पार पाडली. हसरंगाने आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये अष्टपैलू प्रदर्शन करून दाखवले आहे. त्याने या 6 सहा सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फलंदाजीत 66 धावा करून तो बाद झाला. त्याने अंतिम सामन्यात 21 चेंडूत 36 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि गोलंदाजी करताना 3 विकेट्सही घेतल्या. या तिन्ही विकेट्स विकेट्स त्याना पाकिस्तानच्या डावातील 17 व्या षटकात घेतल्यामुळे विरोधी संघ पूर्णपणे कोलमडला. या अप्रमिम प्रदर्शनासाठी हसरंगाला अंतिम सामन्यातील विजयानंतर मालिकावीर निवडले गेले.
श्रीलंकेचा मध्यक्रमातील महत्वाचा फलंदाज भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 45 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 157.78 होता. राजपक्षेच्या या वादळी खेळीच्या जोरावर श्रीलंका संघ प्रथम फलंदाजी करत असताना 170 धावांपर्यंत पोहोचू शकला. मोठी धावसंख्या करण्यासठी राजपक्षेने दिलेल्या योगदानामुळे त्याला सामनावीर निवडले गेले.
दरम्यान, आशिया चषक सुरू झाला, तेव्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ विजेतेपदासाठी प्रमुख दावेदार होते. परंतु भारतीय संघाने सुपर फोरमधील सुरुवातीचे सलग दोन सामने गमावले आणि अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. श्रीलंकन संघ आशिया चषक जिंकले, असे कुणालाच वाटत नव्हते. परंतु त्यांनी विजेतेपद पटकावले आणि स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. मागच्या काही वर्षात निराशाजनक प्रदर्शन करत आलेल्या श्रीलंकेने आशिया चषकात त्यांच्या जुन्या संघाची झलक पाहायला मिळाली. यापूर्वी त्यांनी 1986, 1997, 2004, 2008, 2014 साली त्यांनी ही ट्रॉफी जिंकली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –