आशिया चषक स्पर्धा २७ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांना २८ ऑगस्ट रोजी एकमेकांविरुद्धच्या सामन्याने आशिया चषकाच्या अभियानाची सुरुवात करायची आहे. मागच्या वर्षी पाकिस्तानने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदा भारताचा पराभव केला. आता भारतीय संघ या पराभवाची कसर खरून काढण्याच्या प्रयत्नात आहे. यावेळी पाकिस्तान संघात काही युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे, जे भारतीय फलंदाजांसाटी मोठी बाधा ठरू शकतात. चला तर जाणून घेऊया पाकिस्तानच्या या दोन धुरंधर खेळाडूंविषयी
१. खुशदिल शाह –
पाकिस्तान संघचा २७ वर्षीय अष्टपैलू खुसदिल शाह (Khushdil Shah) याला आशिया चषक २०२२ () संघात निवडले गेले आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागांमध्ये संघासाठी चमकादर कामगिरी करू शकतो. त्याला आशिया चषकाच्या संघात निवडण्याचे कारण स्पष्ट आहे. भारतीय संघाविरुद्ध खेळताना पाकिस्तानला त्यांचा फलंदाजी क्रम अधिक मजबूत बनवायचा आहे. तसेच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतल्यानतंर संघाला एक अतिरिक्त गोलंदाजही मिळतो. यापूर्वी त्याच्या फिरकीच्या जाळ्यात मोठे-मोठे खेळाडू अडकले आहेत.
शाहच्या फलंदाजीचा विचार केला तर, तो भारतीय गोलंदाजांचा नक्कीच घाम काढू शकतो. त्याच्याकडे मोठे मोठे हिट मारण्याची क्षमता आहे. २०२० मध्ये पाकिस्तानसाठी टी-२० विश्वचषकात त्याने तुफानी प्रदर्शन केले होते. सिंध संघाविरुद्ध खेळताना त्याने अवघ्या ३५ चेंडूत शतक ठोकले होते, जे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात वेगवान टी-२० शतक आहे. आशिया चषकात भारताविरुद्ध खेळण्याची संधी त्याला मिळाली, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील संघाला सावधगिरी बाळगावी लागेल, हे मात्र नक्की.
२. मोहम्मद हसनैन –
आशिया चषकाता भारतासाठी पाकिस्तानचा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैन (Muhammad Hasnain) डोकेदुखी ठरू शकतो. सध्या त्याच्याविषयी माध्यमांमध्ये चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. शाहीन शाह आफ्रिदी दुखापतग्रस्त असल्यामुळे हसनैनला संघात सामील केले गेले आहे. त्याने पाकिस्तान संघासाठी १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान १७ विकेट्स त्याने मिळवल्या.
हसनैनविषयी बोलले जात आहे की, तो शाहीन आफ्रिदीपेक्षा घातक ठरू शकतो. त्याच्याकडे गती आणि चेंडू दोन्ही बाजूंना स्विंग करण्याची कला देखील आहे. भारतीय संघासोबत यापूर्वी एकही सामना खेळण्याची संधी त्याला मिळाली नाहीये. भारतासाठी फलंदाजांनी त्याचा यापूर्वी अधिक सामना केला नसल्यामुळे तो पाकिस्तानसाठी काय कमाल करून दाखवतो, हे पाहण्यासारखे असेल. भारतीय संघासाठी तो एक धोक्याची घंटा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
माजी पाकिस्तानी कर्णधाराची मनापासून इच्छा, PAKविरुद्ध भारताच्या इलेव्हनमध्ये असावा ‘हा’ मॅच विनर
अखेर न्यूझीलंडने ‘या’ महत्वाच्या दौऱ्यासाठी जाहीर केलाय संघ! प्रमुख खेळाडूनं केलंय संघात पुनरागमन
इरफान पठाणला एयरपोर्टवर वाईट वागणूक, पत्नी अन् मुलांसमोर झाला अभद्र व्यवहार