---Advertisement---

कोहलीने दाखवले ‘विराट’ मनं! दुबईत पोहोचताच घेतली कट्टर प्रतिस्पर्धी बाबर आझमची भेट

On: गुरूवार, ऑगस्ट 25, 2022 9:17 AM
Virat-Meet-Azam
---Advertisement---

आशिया चषक २०२२ ची सुरुवात होण्यासाठी अवघे २ दिवस बाकी आहेत. तत्पूर्वी सर्व संघ आशिया चषकासाठी संयुक्त अरब अमिरातीला (युएई) पोहोचले आहेत. आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ, भारतीय संघही युएईत दाखल झाला आहे. २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने भारतीय संघ त्यांच्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी माजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची भेट झाली आहे. 

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या कट्टर प्रतिस्पर्धी संघातील सामना नेहमीच दर्शकांसाठी पर्वणी ठरतो. या सामन्याप्रमाणेच दोन्ही संघातील खेळाडूंना एकत्र पाहण्यासाठीही क्रिकेटचाहते फार उत्सुक असतात. अशात विराट (Virat Kohli) आणि आझमला (Babar Azam) एकत्र पाहून चाहते अवाक् झाले आहेत.

आशिया चषकापूर्वीच्या सराव सत्रात (Net Session) विराटने आझमची भेट घेतली. विराटचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. बीसीसीआयने ट्वीटरवर सराव सत्रातील व्हिडिओ शेअर केला (Virat Kohli Meets Babar Azam) आहे. या व्हिडिओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत दिसते की, भारतीय संघ सराव सत्रासाठी दुबई स्टेडियममध्ये जात आहे. यादरम्यान पुढून पाकिस्तानचा संघही सरावासाठी येतो. आझम दिसताच विराट थांबून त्याची भेट घेतो. त्याच्याशी हातमिळवणी करतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. आझमव्यतिरिक्त विराटने अफगाणिस्तानच्या खेळाडूंचीही भेट घेतली. तो अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानशी भेटताना कॅमेऱ्यात कैद झाला.

विराटव्यतिरिक्त युझवेंद्र चहल, हार्दिक पंड्या यांचीही अफगाणिस्तानच्या खेळाडूंशी मुलाखत झाली. मोहम्मद नबी, राशिद खान यांच्याशी भारतीय खेळाडू भेटले.

दरम्यान भारताचा पहिला सामना २८ ऑगस्टला दुबईत पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा साखळी फेरी सामना हाँगकाँग संघाविरद्ध रंगणार आहे. हा सामना ३१ ऑगस्टला दुबईच्या मैदानावरच रंगणार आहे. तर पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या सामन्यानंतर थेट २ सप्टेंबरला हाँगकाँगशी भिडेल.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

Asia Cup: युएईला लोळवत हॉंगकॉंगचा मुख्य स्पर्धेत दिमाखात प्रवेश; भारत-पाकिस्तानला देणार टक्कर
“मी ३५ चा आहे ७५ चा नव्हे”; इंडिया ए संघातही निवड न झाल्याने उद्विग्न झाला जॅक्सन
अखेर विराट बोललाच! खराब फॉर्मच्या प्रश्नावर तोडले मौन; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---