सध्या क्रिकेटविश्वात एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे एशिया कप (Asia Cup). यावर्षी ही स्पर्धा युनायटेड अरब अमिराती (यूएई) येथे खेळली जाणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यासाठी तीनच दिवस शिल्लक आहेत. या सपर्धेची सुरूवात २७ ऑगस्टला श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान या सामन्याने होणार आहे. तर या स्पर्धेसाठी जवळपास सर्व संघांंची नावे जाहीर झाली आहेत. महत्वाच्या स्पर्धांमध्ये काही खेळाडू असे असतात ज्यांच्या एकाच्या प्रदर्शनाच्या जोरावर सामना जिंकून देण्याची क्षमता असते.
यूएईच्या मैदानावर गोलंदाजांचेच वर्चस्व असण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व संघांनी युएईच्या खेळपट्ट्या पाहूनच संघामध्ये गोलंदाजांची निवड केली आहे. काही गोलंदाजांचा सामना करणे फलंदाजांना कठीण जाणार आहे. अशाच गोलंदाजांची आपण माहिती घेऊया ज्यांची खेळपट्टीवर दहशत आणि फलंदाजांच्या मनात धडकी भरवली आहे.
यजमान संघाचा स्टार फिरकीपटू
या यादीत सर्वात प्रथम नाव श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) याचे आहे. त्याने टाकलेल्या चेंडूचा सामना करणे फलंदाजांसाठी एक परिक्षेसारखेच आहे. त्याने आतापर्यंत ३८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यातील ३६ डावांमध्ये १४.१च्या सरासरीने ६२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने टी२०मध्ये दोन वेळा ४ विकेट्स घेण्याची कामगिरीही केली आहे.
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज
अफगानिस्तानचा राशिद खान (Rashid Khan) याचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या फिरकीपटूने त्याच्या उत्तम गोलंदाजी कौशल्याने खूप लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याने टी२० क्रिकेटच्या ६६ सामन्यांमध्ये १३.८च्या सरासरीने ११२ विकेट्स घेतल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शाकीब अल हसन आणि टीम साऊदी नंतर तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताला पॉवरप्लेमध्ये विकेट्सची आशा
या यादीत तिसऱ्या स्थानावर भारताचा वेगवान गोलंदाजी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याचेही नाव आहे. सामन्याच्या सुरूवातीला त्याचे चेंडू खेळण्यास फलंदाजाला अवघड जाण्याची शक्यता आहे. तसेच तो पॉवरप्लेमध्ये संघाला विकेट्स मिळवून देतो. त्याने भारताकडून आतापर्यंत ७१ टी२० सामने खेळले आहेत. त्यातील ७१ डावांमध्ये २३.४च्या सरासरीने ७३ विकेट्स घेतल्या आहेत.
बांगलादेशचा वार
चौथ्या स्थानावर बांगलादेश संघाचा कर्णधार आणि फिरकीपटू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आहे. सध्याच्या काळात तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याच्याकडे अनुभवाची कमतरता नसून तो फलंदाजांवर चांगलाच भारी पडणार आहे. त्याने टी२० क्रिकेटमध्ये बांगलादेशकडून ९९ सामने खेळले आहेत. त्यातील ९७ डावांमध्ये १९.९५च्या सरासरीने १२१ विकेट्स घेतल्या आहेत.
पाकिस्तानचा स्टार गोलंदाज हॅरिस रऊफ
पाचव्या स्थानावर पाकिसानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रऊफ (Haris Rauf) याचे नाव आहे. तो स्पर्धेमध्ये शाहीन आफ्रिदीच्या अनुपस्थितीत संघाच्या वेगवान गोलंदाजाचे नेतृत्व करणार आहे. त्याने पाकिस्तानकडून ३५ टी२० सामने खेळले आहेत. त्यातील ३३ डावांमध्ये २४.९च्या सरासरीने ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याला कोरोना झालाच नाही, हे तर फक्त…’; शास्त्री गुरूजींचे अजब विधान
नशिब फुटकं ते फुटकंच! प्लेइंग ११ मध्ये संधी न मिळाल्याने माजी दिग्गजाने बीसीसीआयला झापलं
विराट की बाबर! आशिया चषकात कोण ठरणार सर्वोत्तम? जाणून घ्या आकडेवारी