भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज आणि उपकर्णधार केएल राहुल सध्या संघातून बाहेर आहे. आगामी आशिया चषकासाठी येत्या काही दिवसात संघ घोषित होईल. केएल राहुल या महत्वाच्या स्पर्धेतून संघात पुनरागमन करेल, असे सांगितले जात आहे. अनेकांच्या मते राहुलला संघात पुनरागमन करणे आता सोपे नसेल. परंतु, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राहुलला संघात पुनरागमन करण्यासाठी कसलीही अडचण येणार नाही. तसेच तो पुन्हा एकदा डावाची सुरुवातही करेल.
यावर्षी खेळला जाणारा आशिया चषक टी-२० प्रकारातील असेल जो २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर यादरम्यानच्या काळात खेळला जाईल. आयपीएल २०२२ हंगामात केएल राहुल (KL Rahul) याने लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व केले. आयपीएल संपल्यानंतर राहुल मायेदशात खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व करणार होता. मात्र, त्याआधीच त्याला गंभीर दुखापत झाली आणि तो मालिकेतून बाहेर पडला. तेव्हापासून त्याला भारतासाठी अद्याप एकही सामना खेळता नाहीये.
मागच्या सहा टी-२० सामन्यांमध्ये राहुल भारतासाठी खेळला नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनाने रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादाव यांना सलामीवीराच्या रूपात आजमावले आहे. परंतु, राहुल जेव्हा संघात पुनरागमन करेल, तेव्हा सलामीवीराची जबाबदारी पुन्हा एकदा त्याच्याकडेच दिली जाईल, असे सांगितले जात आहे. एका बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, “लोकेश राहुलला काहीच सिद्ध करण्याची गरज नाहीये. जेव्हा कधी तो टी-२० खेळतो, तेव्हा सलामीवीर फलंदाजाच्या रूपात खेळतो आणि असेच पुढेही होत राहील. आगामी काळात सूर्यकुमार आणि रिषभ मध्यक्रमातील फलंदाजीच्या रूपात खेळतील.”
असे असले तरी, संघात पुनरागमन केल्यानंतर त्याला स्वतःची फळंदाजी काही प्रमाणात बदलावी लागणार आहे. भारतीय संघ टी-२० क्रिकेटमध्ये अलिकडच्या काळात अधिक आक्रमक खेळी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. अशात संघातील या बदलाप्रमाणे राहुलला देखील बदलावे लागेल. राहुल आयपीएलमध्ये स्वतःच्या संघासाठी धमाकेदार फलंदाजी करतो, त्याच प्रमाणे आता राष्ट्रीय संघालाही सुरुवात द्यावी लागेल.
पण टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये त्याने भारतासाठी नेहमीच हळुवार सुरुवात केल्याचे पाहिले गेले आहे. संघाला वेगवान सुरुवात देऊ न शकल्यामुळे अनेकदा त्याच्यावर टीका होत आली आहे. मधल्या काळात त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार आणि पंतने सुरुवातीच्या षटकांमध्ये ताबडतोड फलंदाजी करून दाखवली होती. अशात त्यालाच जर स्वतःचे सलामीवीराचे स्थान टिकवून ठेवायचे असेल, तर खेळण्याची पद्धत बदलावी लागू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आपण नुसतं पाहात बसायचं! ॲंडरसनने काढलेला ‘हा’ भन्नाट क्लीन बोल्ड बघाच
संपुर्ण यादी: कॉमन वेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी पटकावलेल्या २० मेडल्सची यादी
मियामी बीचवर भारतीय खेळाडू करतायत भलताच एन्जॉय!, पाहा भारतीय ‘तिकडी’चे व्हायरल होणारे फोटो