आशिया चषक 2022 मध्ये शुक्रवारी (2 ऑगस्ट) पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील महत्वाचा सामना शाहजाह येथे खेळला जात आहे. आशिया चषकातील पहिल्या सामन्यांमध्ये या दोन्ही संघांना भारताकडून पराभव स्वीकारला आहे. आता सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी शुक्रवारचा हा सामना महत्वाचा आहे. हाँगकाँगने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परिणामी पाकिस्तानला प्रथम फलंदाजीची करावी लागली.
आशिया चषकात भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग या तिन्ही संघांना ‘ग्रुप ए’ मध्ये सामील केले गेले होते. भारतीय संघाने पाकिस्तान आणि हाँगकाँग यांना पराभूत करून सुपर फोरमध्ये जागा पक्की केली आहे. आता शुक्रवारच्या या सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो सुपर फोरमध्ये स्थान पक्के करणार आहे. सुपर फोरचे सामने शनिवार दिनांक 3 सप्टेंबर पासून सोरू होणार आहेत. सुपर फोरचा पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्या खेळला जाणार असून. पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो रविवारी (4 सप्टेंबर) भारताविरुद्ध खेळेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
हाँगकाँग: निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅकेनी (यष्टीरक्षक), झीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, हरिस रौफ, नसीम शाह, शाहनवाज दहनी, मोहम्मद नवाज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्मावर टीका करणाऱ्या पाकिस्तान खेळाडूने ट्वीटच केले डीलीट, चाहत्यांच्या उत्तरांचा भडीमार
‘दिलसे नहीं दिमाग से खेलना होगा!’ पराभवानंतर कर्णधार शाकिबने पिळले बांगलादेश संघाचे कान
तर ‘हा’ आहे भारतीय संघातील सर्वात कंजूस खेळाडू, शिखर धवनचा मजेशीर खुलासा






