भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आशिया चषक २०२२ साठी कसून सराव करत आहे. संयुक्त अरब अमिरातीला (युएई) पोहोचल्यानंतर लगचेच रोहितने नेट्समध्ये घाम गाळायला सुरुवात केली आहे. परंतु संधी मिळताच तो लहान मुलांप्रमाणे मस्ती करताना दिसला आहे.
भारतीय संघाला (Team India) त्यांचा आशिया चषक २०२२ मधील (Asia Cup 2022) पहिला सामना २८ ऑगस्टला दुबईत पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. तत्पूर्वी दुबईच्या आयसीसी क्रिकेट अकादमीत भारतीय खेळाडू सराव करत आहेत. सरावानंतर रोहित सायकलवर फेरफटका मारताना दिसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्वीटरवर त्याचा फेरफटका मारतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या व्हिडिओत, रोहित (Rohit Sharma) खूप मस्ती करताना दिसत आहे. तो मैदानाबाहेर सायकल चालवण्याबरोबरच मैदानावरही चक्कर मारतो (Rohit Sharma Cycle Ride) आहे. रोहितला असे लहान मुलांप्रमाणे मस्ती करताना पाहून चाहते व्यक्त होत आहेत. अनेकांनी रोहितच्या या भारी व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, रोहितने मस्ती करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही बऱ्याचदा तो संघ सहकाऱ्यांसोबत मौजमजा करताना दिसला आहे.
Vroooming 🛴 into the end of practice session – Captain @ImRo45 style 👌 👌#TeamIndia | #AsiaCup2022 | #AsiaCup pic.twitter.com/OqF9eksgCP
— BCCI (@BCCI) August 25, 2022
दरम्यान रोहितने पाकिस्तानविरुद्ध शेवटचा सामना टी२० विश्वचषक २०२१ मध्ये खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात रोहित खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. परंतु यंदा तो कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्ध उतरणार आहे. तत्पूर्वी रोहित नेटमध्ये चांगलीच मेहनत घेत आहे.
भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या लढतीनंतर हाँगकाँगशी भिडणार आहे. हा सामना ३१ ऑगस्टला दुबईत होईल.
🔊 Sound 🔛#TeamIndia captain @ImRo45 & @imVkohli get into the groove ahead of the first clash against Pakistan.#AsiaCup2022 | #AsiaCup pic.twitter.com/GNd8imnmM3
— BCCI (@BCCI) August 25, 2022
आशिया चषक २०२२ साठी भारत संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.
स्टँडबाय: श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावरच तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू, २ लेकरं झाली पोरकी
ENGvSA: दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस साहेबांचा; अँडरसन-ब्रॉड चमकले
ऑक्टोबरमध्ये पुन्हा आशिया कप! ‘हा’ देश भूषवणार यजमानपद