भारतीय संघ सध्या आगामी आशिया चषकाच्या तयारीत आहे. आशिया चषकासाठी सर्व संघ घोषित झाले आहेत. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. भारताला त्यांच्या अभियानाची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध करायची आहे. या सर्व धामधुमीत बांगलादेश क्रिकेट बोर्डने महिला आशिया चषकाची घोषणा केली आहे, जो यावर्षीच खेळला जाईल.
माध्यमांतील वृत्तानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डने महिला आशिया चषकाच्या आयोजनाविषयी पुष्टी केली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार महिला आशिया चषक १ ऑक्टोबर, ते १६ ऑक्टोबर यादरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यावर्षीया महिला आशिया चषक पुरुषांप्रमाणेच टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे. बांगलादेश संघ या स्पर्धेच यजमानपत भूषवेल. सर्व सामने बांगलादेशच्या सिलहट आंतरराष्ट्रीय स्टेडियवर खेळले जातील. असे असले तरी, आशियाई क्रिकेट काउंसिलकडून अद्याप महिला आशिया चषकाची तारिख घोषित केली गेली नाहीये.
महिला आशिया चषकात खेळणारा एकूण ७ संघ –
तत्पूर्वी महिला आशिया चषकाचा शेवटचा हंगाम २०१८ साली खेळला गेला होती. मागच्या काही वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा खेळवली गेली नाहीये. माध्यमांतील वृत्तानुसार महिला आशिया चषकाच्या आगामी हंगामात ७ संघ सहभागी होतील. आमध्ये भारत (India), पाकिस्तान (Pakistan), श्रीलंका (Sri Lanka), थायलंड (Thailand), मलेशिया (Malaysia), यूएई (UAE) आणि यजमान बांगलादेश (Bangladesh) संघ खेळेल.
तब्बला सहा वेळा ‘या’ संघाने जिंकले आहे विजेतेपद –
दरम्यान, महिला आशिया चषकाची सुरुवात २००४ साली झाली होती. आजपर्यंत या स्पर्धेचे खूण ७ हंगाम खेळले गेले आहेत. यापैकी ६ हंगामात भारतीय संघाने विजय मिळवला. २०१८ मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या हंगामात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता आणि बांगलादेशने पहिल्यांदाच ही ट्रॉफी जिंकलेली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकातील ‘हे’ विक्रम मोडणे नाहीये सोपे, सेहवागने केलाय गोलंदाजीत अजब कारनामा
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा सर्वात अवघड ‘पेपर फुटला’, महत्वाच्या फलंदाजाची कमजोरी झाली उघड
हरभजनला मारायला हॉटेलच्या रूमपर्यंत गेलेला अख्तर, ‘या’ गोष्टीमुळे पेटला होता वाद






