---Advertisement---

फक्त नावाने नव्हे, मनानेही ‘किंग’! लाहोरवरून भेटायला आलेल्या पाकिस्तानी चाहत्याची कोहलीने पूर्ण केली इच्छा

On: शुक्रवार, ऑगस्ट 26, 2022 10:34 AM
Virat-Kohli-Pakistani-Fan-Video
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याची फॅन फॉलोविंग जगभरात आहे. तो भारतातील सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू आहे. विशेष म्हणजे, भारताचा कट्टर दुश्मन असलेल्या पाकिस्तानातही विराटच्या प्रशंसकांची मोठी संख्या आहे.

असाच एक पाकिस्तानी चाहता (Pakistani Fan) विराटला (Virat Kohli) भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लाहोरवरून दुबईला पोहोचला आहे. विराटनेही त्याला निराश केले नाही आणि त्याच्यासोबत सेल्फी काढली आहे. मोहम्मद जिब्रान असे या पाकिस्तानी चाहत्याचे नाव असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ही संपूर्ण घटना दुबईच्या आयसीसी अकादमी मैदानावर घडली आहे. २८ ऑगस्टपासून दुबईत पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाला आशिया चषक २०२२ मधील (Asia Cup 2022) पहिला सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू दुबईत सराव करत आहेत. सराव सत्र संपल्यानंतर विराट संघाची बस पकडण्यासाठी परतत होता. इतक्यात त्याचा पाकिस्तानी चाहता जिब्रान त्याच्यामागे धावत जातो. तो चाहता विराटला हाक मारतो. परंतु विराट घाईत असल्याने तो पटपट संघाच्या बसकडे जातो.

मग विराटच्या मागे येत असलेल्या जिब्रानला पाहून सेक्युरिटी गार्ड्स त्याला अडवतात. मात्र थोड्या वेळानंतर विराट जिब्रानशी भेटतो आणि त्याच्यासोबत सेल्फीसुद्धा क्लिक करतो. विराटसोबत सेल्फी काढल्यानंतर जिब्रान खूपच खूष झाला.

विराटचा पाकिस्तानी प्रशंसक जिब्रानने यूट्यूब चॅनल पाक टीव्हीवर बोलताना सांगितले की, “मी फक्त विराट कोहलीचा चाहता आहे. मी त्याच्यासोबत एक फोटो काढण्याच्या अपेक्षेने पाकिस्तानातून दुबईला आलो आहे. मी या क्षणासाठी एका महिन्यापासून वाट पाहात आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सराव सत्र संपल्यानंतर त्वरित मी त्याला भेटण्यासाठी गेलो. विराट एक शानदार क्रिकेटपटू असण्याबरोबरच चांगला व्यक्तीही आहे. त्याने माझे म्हणणे ऐकले आणि माझ्यासोबत सेल्फीही काढली. यानंतर मी खूपच भावूक झालो आहे.”

विराट सध्या खराब फॉर्मातून जात आहे. अशात विराट लवकरच फॉर्मात परत येईल. तसेच तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ५० पेक्षा जास्त धावा करेल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

चला भूर्रर्र! नेट्समधील धूमधडाक्यानंतर रोहितची लहान मुलांप्रमाणे मस्ती, सायकलवरून मारला फेरफटका
धक्कादायक! हृदयविकाराच्या झटक्याने मैदानावरच तरुण व्यापाऱ्याचा मृत्यू, २ लेकरं झाली पोरकी
अखेर पंजाब किंग्सचा कुंबळेंना ‘थँक्यू व्हेरी मच’! मुख्य प्रशिक्षक म्हणून ‘ही’ नावे पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---