महिला आशिया चषक 2022च्या स्पर्धेत गुरूवारी (13 ऑक्टोबर) पहिला उपांत्य सामना भारत आणि थायलंड यांच्यात सुरू आहे. या सामन्यात थायलंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. भारताने शफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर 20 षटकात 6 विकेट्स गमावत 148 धावासंख्या उभारली.
या सामन्यासाठी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) कर्णधारपदावर परतली. ती मागील दोन सामने खेळली नव्हती. तिच्याबरोबर रेणुका ठाकुर आणि राधा यादव यांनीही अंतिम अकरामध्ये पुनरागमन केले आहे. त्यामुळे एस मेघना, मेघना सिंग आणि किरण नवगिरे यांना बाकावर बसावे लागले आहे.
स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) आणि शफाली वर्मा (Shafali Verma) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली, मात्र भारताला पाचव्याच षटकात धक्का बसला. मंधाना 14 चेंडूत 3 चौकाराच्या साहाय्याने 13 धावा करत बाद झाली. तिच्यानंतर शफालीने जेमीमा रोड्रिग्ज बरोबर धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न ठेवला. अशातच 10व्या षटराच्या पहिल्याच चेंडूवर शफालीने आपली विकेट गमावली. ती 28 चेंडूत 5 चौकार आणि एक षटकार खेचत 42 धावा केल्या.
शफाली बाद झाल्याने भारताची स्थिती 2 बाद 73 धावा अशी झाली. त्याच्या पुढच्याच षटकात जेमीमाने बूनसुखमला तीन चौकार ठोकले. ती 27 धावा करतच तंबूत परतली. हरमनप्रीतही 30 चेंडूत 36 धावा करत बाद झाली. तिने या खेळीत चार चौकार मारले. पूजा वस्त्राकरने झटपट फलंदाजी करत भारताला दिडशेच्या जवळ नेले. तिने 13 चेंडूत एक षटकार खेचत 17 धावा केल्या.
थायलंडकडून सोर्नारिन टिपोच हीने चांगली कामगिरी केली. तिने 4 षटकात 24 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तिने शफाली, हरमनप्रीत आणि रिचा घोष यांच्या विकेट्स घेतल्या.
4⃣2⃣ Runs
2⃣8⃣ Balls
5⃣ Fours
1⃣ Six@TheShafaliVerma set the tone for #TeamIndia in the #AsiaCup2022 Semi-Final! 👍 👍 #INDvTHAIFollow the match ▶️ https://t.co/pmSDoClWJi
📸 Courtesy: Asian Cricket Council pic.twitter.com/vLwtJF0Smj
— BCCI Women (@BCCIWomen) October 13, 2022
सलामीवीर नन्नपत कोंचरोएंकाय (Nannapat Koncharoenkai) आणि नत्थकन चन्थम (Natthakan Chantham) यांच्यामुळे थायलंड पहिल्यांदाच उपांत्यफेरीपर्यत मजल मारू शकला आहे.
दीप्ति शर्मा हीने या स्पर्धेत आतापर्यंत 10 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे ती सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताने मागच्याच सामन्यात थायलंडला 37 धावसंख्येवर सर्वबाद केले होते. यामुळे पुन्हा एकदा भारताकडून त्याच कामगिरीची अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बेन स्टोक्सची फिल्डिंग पाहून भले-भले थक्क! संघाला मिळवून दिला सलग दुसरा विजय
बीसीसीआय अध्यक्ष असताना गांगुलीचे गाजले ‘हे’ चार वाद, एकात विराटचाही सहभाग