---Advertisement---

शाहिद आफ्रिदीकडून ही अपेक्षा नव्हती! भारत-पाकिस्तान सामन्याबाबत बरळला असे काहीतरी

On: बुधवार, ऑगस्ट 24, 2022 2:40 PM
Shahid Afridi
---Advertisement---

आगामी एशिया कप (Asia Cup)आधी क्रिकेटविश्वातील वातावरण चांगलेच तापले आहे. कारण सर्वत्र चर्चा ही भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यांचीच होत आहे. मागील वर्षी टी२० विश्वचषकात हे दोन संघ दुबई येथेच समोरा-समोर आले होते. तो सामना पाकिस्तानने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली  १० विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे आता दोन्ही संघ त्यांची चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे.

एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) हा सामना २८ ऑगस्टला दुबई येथे खेळला जाणार आहे. या सामन्याबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर झालेल्या प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये कोणता संघ जिंकणार याचे उत्तर सांगितले आहे. कोणालाही वाटेल की तो पाकिस्तान संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानेल, मात्र त्याने मोजूनमापून आपले उत्तर दिले आहे. आफ्रिदीने म्हटले, ‘जो संघ कमी चुका करणार तोच हा सामना जिंकणार.’

आफ्रिदी हा त्याच्या आश्चर्यजनक विधानाने ओळखला जातो. आताही त्याने असेच चकीत करणारे उत्तर दिले आहे. या सामन्याआधीच दोन्ही संघांना मोठे धक्के बसले आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदी हे वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकले आहेत. तसेच हर्षल पटेल हा पण एशिया कपमध्ये खेळणार नाही.

https://twitter.com/SAfridiOfficial/status/1561360778879434758?s=20&t=m7MvGf96xVH6ifgWOkk9Eg

भारत आणि पाकिस्तान संघ मागील काही वर्षांपासून फक्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच एकमेंकांविरोधात खेळतात. त्यांच्यात पहिल्याप्रमाणे द्विपक्षिय मालिका खेळवल्या जात नाहीत. यावर्षी या दोन संघामध्ये अनेक सामने खेळले जाण्याची शक्यता आहे. एशिया कपच्या साखळी फेरीत हे विरोधात खेळणार आहेत. तर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत ते पोहोचले तर पुन्हा एकदा समोरा-समोर येतील. हा सामना ११ सप्टेंबरला खेळला जाणार आहे. नंतर या संघांमध्ये २३ ऑक्टोबरला टी२० विश्वचषकात सामना खेळला जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर इथं शतक हाणून बसलाय अन् विराटला साधा सिक्स मारायला जमंना!
फलंदाजांना सळो की पळो करून सोडायला एशियातील सर्वोत्तम ५ गोलंदाज सज्ज, वाचा संपूर्ण यादी
विराट अन् रोहित सारखाच भविष्यात ‘हा’ खेळाडू करणार चाहत्यांच्या मनावर राज्य, भज्जीची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---