अनेक क्रिकेट बोर्ड त्यांच्या खेळाडूंनी ब्रॅंडशी किंवा इतर लीगशी करार करण्याच्या विरोधात कठोर भुमिका घेत आहेत. यावरून काही संघांनी त्या खेळाडूंना तो करार रद्द करा नाही तर तुम्हाला संघातून काढण्यात येईल असे कडक निर्णय घेत आहेत. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने त्यांच्या खेळांडूना संयुक्त अरब अमिरातीच्या टी२० लीगमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. त्यातच बांगलादेश क्रिकेट बोर्डचे (बीसीबी) अध्यक्ष नजमुल हसन यांनी खेळाडूंना लीगमध्ये खेळण्याची नाही तर एका ब्रॅंडशी करार केल्याबाबत निराशा व्यक्त केली आहे. याचाच फटका बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन बसला आहे.
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने बेटविनर या बेटींग ब्रॅंडशी करार केल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डने तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. त्याला एकतर तो करार रद्द करावा लागेल अथवा एशिया कपच्या (Asia Cup) संघातून बाहेर व्हावे लागेल, अशा शब्दांत नजमुल यांनी गुरूवारी (११ ऑगस्ट) आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
शाकिबने बेटविनरशी करार केल्याने खूप वादळ उठले आहे. नजमुल यांनी म्हटले, आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. मी आधीच सांगितले होते की, बेंटिगशी आमचा कोणताही संबंध नसणार ते आणि त्या गोष्टीला आम्ही कधीच स्विकारू शकत नाही. यामुळेच आम्ही अशरफुलसारख्या खेळाडूंना बाहेर केले आहे.
आम्ही त्याला एक पत्र देखील पाठवले आहे. त्या पत्राचे उत्तर आज यायला पाहिजे होते. आम्ही त्याच्या उत्तराची वाट पाहणार आहोत. ते आले की त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच त्याने जर तो करार रद्द नाही केला तर त्याला संघात घेतले जाणार नाही. कर्णधारपदाचा विचार नंतर येतो. बोर्डने त्यांचा निर्णय घेतला असून त्यात कोणताही बदल केला जाणार नाही, असेही नजमुल यांनी पुढे म्हटले आहे.
शाकिबने बेटविनरशी भागीदारी केल्यानंतर बीसीबीने त्याबाबत विचारणा केली होती. बोर्डने त्यावर प्रश्न देखील विचारले होते. बोर्ड सट्टेबाजीच्या विरूद्ध आहे. यावर शाकिब काय निर्णय घेणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsPAK: दुबईचे मैदान अन् रोहित शून्यावर बाद! चाहत्यांच्या कायम लक्षात राहिलेला ‘तो’ सामना
Asia Cup 2022 | पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी विराटने सुरू केला सराव, पाहा व्हिडिओ
Asia Cup 2022 | बुमराहच्या अनुपस्थितीत चमकदार कामगिरी करू शकतात भारताचे ‘हे’ तीन गोलंदाज