आशिया चषक 2022 चा अंतिम सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेलळा जाणार आहे. 11 सप्टेंबर रोजी खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तान आणि श्रीलंका संघ सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात आमने सामने आले होते. श्रीलंकन संघाने हा सामना 5 विकेट्स राखून जिंकला. या सामन्यात श्रीलंकेसाठी पथुम निसानकाने चांगली खेळी केली. कर्णधार दासुन सनाकाकडून देखील मोठ्या खेळीची अफेक्षा होती, पण त्याचाला तो स्वस्तात झेलबाद झाला. त्याचा झेल पकडल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचा मैदानातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दासुन शनाका (Dasun Shanaka ) मोहम्मद हसनैन (Mohammad Hasnain) याच्या चेंडूवर 21 धावा करून झेलबाद झाला. पाकिस्तानच्या हसन अली (Hasan Ali ) याने हा उत्कृष्ट झेल पकडला. यादरम्यान, एक असा प्रसंग पाहायला मिळाला, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कर्णधार शनाकाचा झेल पकडल्यानंतर मैदानात हसन अली आणि इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) मजेशीर अंदाजात दिसले. त्याठिकाणी दोन्ही खेळाडू झेल पकडल्यानंतर मैदानात खाली बसून ‘कॅच-कॅच’ खेळताना दिसले.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा एकंदरित विचार केला, श्रीलंकन संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 121 धावा केल्या. त्यांचा संघ संपूर्ण 20 षटके देखील खेळू शकला नाही. कर्णधार बाबर आझम एकमेव फलंदाज ठरला, ज्याने 30 धावांचा टप्पा गाठला. प्रत्युत्तरात श्रीलंकन संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेला पथुम निसानका यांने नाबाद 55 धावांची खेळी केली.
What a Catch @RealHa55an pic.twitter.com/bQO7FCasAE
— Khalid Hashmani (@hashmani2010) September 9, 2022
श्रीलंकान संघाने आशिया चषकात चमकदान कामगिरी केली आहे आणि अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. आशिया चषकाच्या चालू हंगामात खेळलेल्या पाच सामन्यांपैकी पाचही सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानने पाच पैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आता उभय संघाती अंतिम सामन्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘भारतीय संघात समतोल राखण्यासाठी DK अन् RPला एकत्र खेळावे लागेल!’ दिग्गजाचा सल्ला
इंग्लंडसाठी आनंदाची बातमी! वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुनरागमनाच्या वाटेवर, लवकरच होणार संघात सामील
विराटच्या शतकावर शास्त्री गुरूजींची खास शैलीत टिप्पणी! म्हणाले, ‘त्याचं किमान 5 किलो वजन…’