भारताचा उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल आता पुन्हा एकता संघाचा नियमित सदस्य बनला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने संघात पुनरागमन केले असले, तरी त्याला अपेक्षित प्रदर्शन मात्र करता आले नाहीये. याच पार्श्वभूमिवर अनेकजण राहुलवर टीका करत आहेत. तो संघात परतल्यानंतर अद्याप मोठी खेळी करू शकला नसला, तरी भारताचे माजी दिग्गज कर्णधार सुनिल गावसकर यांना विश्वास आहे की, राहुल लवकरच चांगले प्रदर्शन करेल आणि त्याच्यावर संघाने विश्वास दाखवला पाहिजे.
आयपीएल 2022 नंतर केएल राहुल (KL Rahul) याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले होते. आयपीएलंतर मायदेशात खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकी टी-२० मालिकेत राहुल भारताचे नेतृत्व करणार होता. पण त्यापूर्वीच त्याला दुखापच झाली, आणि मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर भारताच्या इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दौऱ्यातून देखील त्याला माघार घ्यावी लागली. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून त्याने पुनरागमन केले, पण चांगले प्रदर्शन करू शकला नाही. त्याने या दौऱ्यातील दोन सामन्यांमध्ये अवघ्या 31 धावा केल्या. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळताना तो खातेही खोलू शकला नाही. तसेच हाँगकाँगविरुद्ध त्याने 39 चेंडूत 36 धावा केल्या.
भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते राहुलला अजून संधी दिल्या पाहिजेत. माध्यमांशी बोलताना गावसकर म्हणाले, “मला वाटते की, केएल राहुल एक क्लास एक्ट आहे. मागच्या काही वर्षातील त्याचे प्रदर्शन पाहता मला वाटते, जर तुम्ही इतरांना संधी देत असाल, तर केएल राहुलला अजून संधी का देत नाही? तो तुमचा उपकर्णधारही आहे. तुम्ही त्याला अजून संधी द्या, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की, तो टी-२० प्रकारात काय करू शकतो. तो दुखापतीतून पुनरागमन करत आहे, त्यामुळे लय मिळत नाहीये. पण लय येईल आणि जेव्हा येईल तेव्हा विरोधकांसाठी ही चांगली बातमी नसेल.”
दरम्यान, राहुल जरी आशिया चषकातील पहिल्या दोन्ही सामन्यात अपेक्षित खेळी करू शकला नसला, तरी भारताने हे दोन्ही सामने जिंकले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने 5 विकेट्स राखून विजय मिळवला होता, तर हाँगकाँगविरुद्ध भारत 40 धावा राखून जिंकला आहे. भारतीय संघ आता आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये सहभागी झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अल्टीमेट खो खो लीगच्या पहिल्या मौसमसाठी एकूण 2कोटी पारितोषिक रक्कम जाहीर; प्ले ऑफ सामन्यांना शुक्रवारी प्रारंभ
धवनसाठी मुलगी शोधा! नवीन व्हिडिओ व्हायरल, भारताचा सलामीवीर करणार का दुसरे लग्न?
‘भारताचा सामना पाहण्यासाठी येऊ नकोस’, BAN vs AFG सामन्यात दिसलेल्या सुंदरीची सुरुये सर्वत्र चर्चा