---Advertisement---

Asia Cup 2022: अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाच फेव्हरेट! आकडेवारीच आहे भन्नाट

On: शनिवार, ऑक्टोबर 15, 2022 9:36 AM
Team India
---Advertisement---

महिला आशिया चषक (Asia Cup) 2022च्या अंतिम फेरीत भारत आणि श्रीलंका हे दोन संघ दाखल झाले. हा सामना शनिवारी (15 ऑक्टोबर) भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजता खेळला जाणार आहे. हा सामना बांगलादेशच्या सिल्हेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत भारताने थायलंडचा आणि श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करत शेवटची फेरी गाठली.

पुरूष संघाची बरोबरी करण्याची भारतीय महिलांकडे संधी
भारतीय महिलांनी अंतिम सामना जिंकला तर ते पुरूष संघाची बरोबरी करतील. भारताच्या पुरूष संघाने आतापर्यंत सात वेळा आशिया चषक जिंकला आहे, तर महिलांनी सहा वेळा. या स्पर्धेत भारताने अनेकांना संधी दिली. युवा ओपनर शेफाली वर्मा हीने या स्पर्धेत 161 धावा करत तीन विकेट्सही घेतल्या आहेत. तर मधल्या फळीतील जेमीमा रोड्रिग्ज जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

भारत-श्रीलंका आमनेसामने
भारताचे पारडे श्रीलंकेविरुद्ध जड आहे. कारण दोन्ही संघ टी20मध्ये 22 वेळा समोरासमोर आली आहे. ज्यामध्ये भारताने 17 वेळा विजय मिळवला आहे तर श्रीलंकेने चार सामने जिंकले असून एका सामन्याचा निकालच लागला नाही. आशिया चषकातही भारताने श्रीलंकेला तीन सामन्यात पराभूत केले आहे. या स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला होता.

त्याचबरोबर भारत सलग आठव्यांदा आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. श्रीलंका पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी 14 वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारताने 2004, 2005-06, 2006 आणि 2008 या आशिया चषक स्पर्धांच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला आहे, मात्र ते सामने वनडे प्रकारचे होते.

भारतीय खेळाडूंची कामगिरी
जेमीमाने दुखापतीतून संघात पुनरागमन करत उत्तम कामगिरी केली आहे. तिने या चालू स्पर्धेच्या 7 सामन्यात 215 धावा केल्या आहेत. यामुळे ती सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तिच्यानंतर श्रीलंकेची हर्षिता मदवी आहे. तिने 7 सामन्यात 201 धावा केल्या आहेत. तर शेफाली तिसऱ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत दीप्ति शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. तिने 7 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत.

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात खालील खेळाडूंमधून प्लेईंग इलेवन निवडली जाईल,

भारतीय महिला संघ: शफाली वर्मा, स्मृती मंधना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, राधा यादव, रेणुका सिंग, राजेश्वरी गायकवाड, एस मेघना, मेघना सिंग, हेमलता, किरण नवगिरे.

श्रीलंकेचा महिला संघ: चमारी अट्टापटटू (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हर्षिता मदवी, निलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, ओशादी रणसिंघे, कविशा दिलहारी, मलशा शेहानी, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरा, अचिनी कुलसूरिया, तारिका सेवंदी, मदुशिका मेथतनंदा, रश्मी सिल्वा, कौशनी नुथ्यांगना.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘असं नाहीये…’, गांगुलींविषयीच्या चुकीच्या बातम्यांवर बीसीसीआय अधिकाऱ्यानेच लावला पूर्णविराम
‘त्याचे खेळातील सातत्य पाहून मी प्रभावित झालो…’, भारतीय दिग्गजाकडून सॅमसनवर कौतुकाचा वर्षाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---