आशिया चषक २०२२ ची जोरदार तयारी सुरू आहे. संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व आशियाई संघ कसून सरावाला लागले आहेत. यादरम्यान चाहत्यांना भारतीय संघाच्या आशिया चषकासाठी नवी जर्सी कशी असेल?, याची आतुरता लागून आहे. अशात आता या जर्सीचा पहिला फोटो पुढे आला आहे. आयसीसीच्या किंवा इतर कोणत्याही स्पर्धेत क्रिकेटपटू नवी जर्सी घालून मैदानात उतरत असतात. या जर्सीवर त्या स्पर्धेचे नावही लिहिलेले असते. याच कारणामुळे भारतीय क्रिकेट चाहते भारतीय संघाच्या आशिया चषकासाठीच्या जर्सीच्या प्रतिक्षेत आहेत.
आता भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने या जर्सीची झलक चाहत्यांना दाखवली आहे. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर नव्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे. याबरोबरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय, BCCI) भारतीय खेळाडूंच्या फोटोशूटचा व्हिडिओ शेअर (Team India’s New Jersey) केला आहे.
जडेजाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये आशिया चषकासाठीची जर्सी (Jersey For Asia Cup) घातलेला फोटो शेअर केला आहे. तसेच बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंचा जर्सीच्या फोटोशूटचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघाची जर्सी निळ्या रंगाची आहे. या जर्सीच्या एका बाजूला बीसीसीआयचा लोगो आणि त्यावर तीन स्टार काढलेले आहेत. हे ३ स्टार भारतीय संघाने ३ वेळा विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे, हे दर्शवतात. तर दुसऱ्या बाजूला आशिया चषक २०२२ चा लोगो लावलेला आहे.
Laughter, camera, some games and more….
Behind the scenes from #TeamIndia's headshots session ahead of #AsiaCup2022 📽️📽️ pic.twitter.com/go8nuPWBbg
— BCCI (@BCCI) August 26, 2022
केव्हा, कोणाविरुद्ध खेळणार भारतीय संघ?
दरम्यान आशिया चषकातील भारतीय संघाचा पहिला सामना २८ ऑगस्टला दुबईत खेळला जाणार आहे. हा सामना पाकिस्तानविरुद्ध रंगेल. त्यानंतर ३१ ऑगस्टला हाँगकाँगविरुद्ध भारतीय संघ दोन हात करेल. हा सामनाही दुबईत होईल. त्यानंतर जर भारतीय संघ अ गटात टॉप-२ मध्ये राहिला तर सुपर-४ मध्येही प्रवेश करू शकतो.
सात्विक-चिराग यांनी रचला इतिहास! वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये भारताचे पदक पक्के
काय हा रिषभ! दुखापतग्रस्त आफ्रिदीची भारतीय खेळाडूंकडून विचारपूस, पंतने इथेही चेष्टा केलीच
आशिया चषकापूर्वी धोनीच्या आठवणीत कोहली भावूक; म्हणाला, ‘७+१८, आमची भागीदारी…’