बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकातील (Asia Cup) दहावा सामना पाकिस्तान विरुद्ध थायलंड यांच्यात झाला. गुरूवारी (6 ऑक्टोबर) सिलहेट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला. शेवटच्या चेंडूवर रंगलेल्या या सामन्यात थायलंड संघाने पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आहे. थायलंडने या सामन्यात सर्व विभागात उत्तम कामगिरी करत पाकिस्तानवर पहिला विजय मिळवला आहे.
या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार बिस्माह महरूफ हिने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना एकतर्फी होणार अशा चर्चा सुरू असतानाच मुनीबा अली 15 धावा करताच बाद झाली, तर अमीन हीच्या अर्धशतकाच्या बळावर पाकिस्तानने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 116 धावा केल्या.
थायलंडकडून सलीमीवीर नत्थाकन चँथम हिने सर्वाधिक अशा 61 धावा केल्या. तिने ही सामनाविजयी खेळी 51 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने केली. तिच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूने 20चा आकडा पार केला नाही. नन्नापत कोंचरोएंकाईने 13 आणि कर्णधार नरुमोल चायवाईने 17 धावा केल्या.
Pure joy 😁
What a win, @ThailandCricket 🌟#WomensAsiaCup2022pic.twitter.com/2biBESwySy
— ICC (@ICC) October 6, 2022
या सामन्यातील शेवटच्या षटकात थायलंडला जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता होती. तेव्हा चेंडू अनुभवी गोलंदाज डायना बेग हीच्या हातात होता. तिने दुसरा चेंडू फुलटॉस टाकल्याने थायलंडच्या रोसीनन ने चौकार ठोकला. नंतर पुढच्या तीन चेंडूवर थायलंडने चार धावा करत सामना आपल्या नावे केला आहे. त्यांनी एक चेंडू आणि 4 विकेट्स शिल्लक राखत सामना जिंकला आहे.
Thailand hold their nerve to register a four-wicket win in the final over 👀
They have beaten Pakistan for the first time in Women’s T20Is 👏#WomensAsiaCup2022 | Scorecard: https://t.co/5t6gEvjgSe pic.twitter.com/mLs0wB99vf
— ICC (@ICC) October 6, 2022
थायलंडने या विजयाने गुणतालिकेत आपले खाते उघडले आहे. पाकिस्तानचा पुढील सामना भारताविरुद्ध आहे. हा सामना 7 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. त्याच दिवशी थायलंड संयुक्त अरब अमिराती यांच्याशी दोन हात करणार आहेत.
गुणतालिकेत सध्या भारत तीन विजयामुळे 6 गुण जिंकत पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तानचा संघ 3 पैकी 2 सामने जिंकत दुसऱ्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
T20 World Cup: दुखापतीतून सावरलेल्या ‘या’ खेळाडूसमवेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाणा
INDvSA: ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा माझे आदर्श’, पहिल्या वनडेपूर्वीच खेळाडूचे मोठे वक्तव्य