पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आशिया चषकाची सुरुवात जबरदस्त केली. पहिल्याच सामन्यात त्याने नेपाळविरुद्ध शतक ठोकले आणि आपला तगड्या फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील हा सामना बुधवारी (30 ऑगस्ट) मुलतानमध्ये खेळला गेला.
बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने आशिया चषक 2023च्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अवघ्या 25 धावांवर दोन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि शतक ठोकले. बाबरतने 109 चेंडूत शतक पूर्ण केले. बाबरच्या वनडे कारकिर्दीतील हे 19 वे शतक ठरले.
Babar Azam has 19 hundreds & 28 fifties from just 102 innings in ODI.
– Truly a great in ODIs…..!!!!pic.twitter.com/TlEHi97WJP
— Johns. (@CricCrazyJohns) August 30, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान – फखर झमान, ईमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, आघा सलमान, शादाब खान, मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ.
नेपाळ – कुशल भुरटेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, गुलसन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी.
(Asia Cup 2023 । CENTURY BY BABAR AZAM IN 109 BALLS Against Napal)
महत्वाच्या बातम्या –
महिला क्रिकेटसाठी ईसीबीचा मोठा निर्णय! पुरुष आणि महिला खेळाडूंना एकसमान मॅच फी
विश्वचषकापूर्वी बांगलादेश संघाला मोठा झटका! महत्वाचा गोलंदाज दुखापतीमुळे ‘इतके’ महिने बाहेर