सध्या श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ आशिया चषक 2023 स्पर्धेचे आयोजन करत आहेत. या स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने पार पडले असून या दोन्ही यजमान संघांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचा धक्का दिला आहे. अशात तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान 2 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांवर सर्वांची नजर असणार आहे.
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेचा तिसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात खेळला जाणार आहे. हा सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या कँडी येथील पल्लेकेले मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3 वाजता सुरू होईल. या सामन्याची सर्व क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा लागली आहे. असे असताना दोन्ही संघांची ताकद ही वेगवान गोलंदाजी दिसू शकते.
भारतीय संघाकडे सध्या तीन अनुभवी आणि दमदार वेगवान गोलंदाज आहेत. तब्बल 11 महिन्यानंतर पुनरागमन केलेला जसप्रीत बुमराह भारतीय मारायचे नेतृत्व करेल. त्याच्यासोबत सध्या भारताचा क्रमवारीतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज व अनुभवी मोहम्मद शमी हे वेगाने वार करताना दिसतील. या तीनही गोलंदाजांना तमाम क्रिकेट समीक्षक अत्यंत वरच्या दर्जाचे म्हणताना दिसले आहेत.
दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा विचार केला तर सध्या जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची तिकडी त्यांच्याकडे दिसून येते. डावखुऱ्या हाताचा शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व युवा नसीम शहा हे तीनही गोलंदाज सातत्याने 145 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करतात. डाव्या हाताचा आफ्रिदी भारतीय संघाला अनेकदा त्रस्त करताना दिसला आहे. पाकिस्तानी गोलंदाजीतील हे वैविध्य भारतीय संघासाठी त्रासदायक ठरू शकते.
(Asia Cup 2023 Clash Of India And Pakistan Pacers Bumrah Siraj Shami Face Shaheen Naseem Rauf)
हेही वाचाच-
‘हा’ भारतीय ठेचणार बाबरच्या नांग्या, IND vs PAK सामन्यापूर्वी दिग्गजाची भविष्यवाणी
‘पाकिस्तानी तिकडीविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल’, महामुकाबल्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भारताला चेतावणी