---Advertisement---

‘पाकिस्तान खूपच…’, हायव्होल्टेज सामन्यापूर्वी ‘किंग’ कोहलीची सर्वात मोठी प्रतिक्रिया

Virat-Kohli
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेच्या कुंभमेळ्याला 30 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील दोन सामने पार पडले असून दोन्ही सामने सहयजमानांनी जिंकले आहेत. अशात भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील महामुकाबला 2 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी चांगली तयारी केली आहे. अशात आता या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने सामना आणि वनडे क्रिकेटविषयी मोठे विधान केले आहे. विराट कोहली पाकिस्तान संघाविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक असल्याचे म्हणाला आहे.

विराट कोहली पाकिस्तान संघाविषयी काय म्हणाला?
स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विराट कोहली (Virat Kohli) वनडे क्रिकेट प्रकार आणि पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्याविषयी मत व्यक्त करताना दिसत आहे. वनडेच्या अग्निपरीक्षेविषयी बोलताना विराट म्हणाला, “वनडे क्रिकेटमध्ये नेहमीच माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी होते. वनडे क्रिकेटमधील आव्हान मला आवडते. यामध्ये मी हाच प्रयत्न करतो, की परिस्थितीनुसार खेळेल आणि आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकेल. वनडे क्रिकेटमध्ये तुमच्या खेळाची पूर्ण कसोटी असते.”

पाकिस्तान संघाविरुद्धच्या सामन्याविषयी विराट म्हणाला, “पाकिस्तानविरुद्ध खेळणे खूपच आव्हानात्मक असते. पाकिस्तान खूपच प्रतिभावान संघ आहे. मात्र, मला वाटते, की गोलंदाजी पाकिस्तानची मजबूत बाजू आहे. त्यांच्याकडे शानदार गोलंदाज आहेत, जे आपल्या कौशल्याच्या जोरावर कधीही सामना पलटू शकतात. त्यांचा सामना करण्यासाठी तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागेल.”

वनडेतील यशाविषयी विराट म्हणाला, “मी नेहमी हाच प्रयत्न करतो की, मी प्रत्येक दिवशी, प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक हंगामात सर्वोत्तम कशाप्रकारे होऊ शकतो. मी नेहमी स्वत:ला चांगले बनवण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही मेहनत घेतली, तर कामगिरी आपोआप चांगली होईल. माझी नेहमी हीच मानसिकता राहिली आहे.”

विराट कोहली याच्याविषयी बोलायचं झालं, तर विराट पाकिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी करतो. चाहत्यांना आशा आहे, की आशिया चषक 2023 स्पर्धेतही विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल. (asia cup 2023 indian star cricketer virat kohli give big statement before pakistan clash ind vs pak see video)

हेही वाचाच-
IND vs PAK महामुकाबल्यापूर्वी माजी खेळाडूचा बाबरला मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘भारताविरुद्ध हारलो तरीही…’
पाकिस्तानविरुद्ध जिंकायचंय? तर भारतीय संघाला ‘या’ 3 समस्यांवर काढावा लागेल तोडगा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---