फक्त भारतातीलच नाहीत, तर जगभरातील क्रिकेटप्रेमी आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याची वाट पाहत आहेत. हा सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या कँडी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ याने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने बाबर आझम याच्याविषयी भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे, की भारताच्या एका गोलंदाजाचा सामना करताना बाबरला खूपच त्रास होईल.
मोहम्मद शमी (Mohammad Shami) हा मागील वर्षभरात भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीतील सर्वात प्रमुख गोलंदाज राहिला आहे. कारण, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याच्यासोबत चांगली भागीदारी बनवली होती. युवा गोलंदाज सिराजसोबत शमीने मागील एक वर्षीत भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले. यादरम्यान त्याने एकूण 12 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला 23 विकेट्स घेण्यात यश आले आहे.
‘बाबरला होणार शमीचा त्रास’
दुसरीकडे, पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) हादेखील शानदार फॉर्ममध्ये आहे. बाबरने आशिया चषकाची सुरुवात 131 चेंडूत 151 धावांची शतकी खेळी साकारून केली आहे. ही खेळी विराट कोहली (Virat Kohli) याच्या 183 धावांनंतरची दुसरी सर्वात मोठी खेळी आहे. अशात बाबर आणि शमीचा सामना पाहण्यात प्रेक्षकांना चांगलीच मजा येणार आहे.
याचबाबत मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) म्हणाला, “मोहम्मद शमी हा एक शानदार गोलंदाज आहे. त्याचा फॉर्मही खूपच चांगला आहे. एवढेच नाही, तर बुमराच्या अनुपस्थितीतही त्याने गोलंदाजी फळी चांगल्याप्रकारे हाताळली. आयपीएलमध्ये त्याचा फॉर्म शानदार होता, त्यामुळे त्याच्यात खूपच प्रतिभा आहे. माझ्या मते, बाबर आझमला मोहम्मद शमीचा सामना करण्यात त्रास होणार आहे.”
शमीची कामगिरी
शमीसाठी आयपीएल 2023 हंगाम खूपच खास ठरला होता. या हंगामात त्याने 28 विकेट्स घेऊन ‘पर्पल कॅप’ नावावर केली होती. आता त्याचे लक्ष आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील भारत-पाकिस्तान (India-Pakistan) सामन्यावर आहे. अशात शमी कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (asia cup 2023 ind vs pak match mohamad kaif on babar azam said this know here)
हेही वाचाच-
‘पाकिस्तानी तिकडीविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल’, महामुकाबल्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भारताला चेतावणी
‘आमच्याकडे शाहीन, नसीम आणि हॅरिस नाहीत, पण…’, पाकविरुद्धच्या मॅचपूर्वी रोहितच्या विधानाची सर्वत्र चर्चा