Asia Cup 2023क्रिकेटटॉप बातम्या

‘आमच्याकडे शाहीन, नसीम आणि हॅरिस नाहीत, पण…’, पाकविरुद्धच्या मॅचपूर्वी रोहितच्या विधानाची सर्वत्र चर्चा

भारतीय संघ 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आशिया चषक 2023 स्पर्धेतील आपले अभियानाची सुरुवात करणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषद घेतल्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 5 वाजून 12 मिनिटांनी सुरू झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी रोहितने, अंतिम सामना आणि रणनीतीबद्दल भाष्य केले. चला तर, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

भारत-पाकिस्तान अंतिम सामना होणार का?
आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात अंतिम सामना झाला नाहीये. यावेळी काय होईल? असा प्रश्न विचारला असता रोहित शर्मा (Rohit Sharma) याने शक्यता वर्तवली. तो म्हणाला, “कदाचित यावेळी स्पर्धेत तुम्हाला दे पाहायला मिळू शकते. आशिया चषक ही एक खूप मोठी स्पर्धा आहे.”

‘आमच्याकडे शाहीन, नसीम आणि हॅरिस नाहीत’
एका प्रश्नाचे उत्तर देताना रोहित म्हणाला की, “पाकिस्तान एक मजबूत संघ आहे. त्यांच्याविरुद्धचे आव्हान मोठे असेल. सामना जिंकण्यासाठी चांगले खेळावे लागेल. नाणेफेक जिंका, सामना जिंका यांसारखी स्थिती कदाचितच असेल. लहान लहान ध्येय नेहमी पूर्ण होतात. आमचे पहिले उद्देश्य पाकिस्तानला पराभूत करणे आहे, बाकी पुढे पाहूया. आमच्याकडे शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ नाहीयेत, पण जे काही आहे, त्याच्यावरच सामना करू.”

आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी उभय संघ
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन

पाकिस्तान संघ
बाबर आजम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हॅरिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, सौद शकील. (Indian skipper rohit sharma press conference india vs pakistan asia cup 2023)

हेही वाचाच-
सेहवागने पाया घातलेल्या ‘या’ विक्रमात न्यूझीलंडचा फलंदाजही सामील, इंग्लंडच्या गोलंदाजाला चोप चोप चोपलं
खूपच जास्त नाराज आहे संजू सॅमसन! यष्टीरक्षक फलंदाजांचा ‘तो’ फोटो व्हायरल, कारणही घ्या जाणून

Related Articles