आशिया चषक 2023 स्पर्धेत 6 संघ खेळत असले, तरीही या स्पर्धेची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. या स्पर्धेची सुपर- 4 फेरी मधल्या टप्प्यात आहे. तसेच, अंतिम सामन्यासाठी दोन संघांची जागा पक्की मानली जात आहे. अलीकडेच आशिया चषकाशी संबंधित मोठी माहिती समोर येत आहे. त्यानुसार, स्पर्धेच्या अंतिम संघांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
खरं तर, क्रिकेट जाणकार दावा करत आहेत की, आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात खेळला जाऊ शकतो. असे झाले, तर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात आणखी एक सामना पाहणे चाहत्यांसाठी कठीण होईल. चला तर, याविषयीच्या समीकरणाविषयी जाणून घेऊयात…
कोणत्या संघांमध्ये होणार आशिया चषक 2023चा अंतिम सामना?
आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील दोन संघांविषयी बोलायचं झालं, तर सध्याच्या स्थितीनुसार, भारत आणि पाकिस्तान संघांची जागा पक्की मानली जात होती. मात्र, ताज्या समीकरणाने संपूर्ण रोमांचकता संपवून टाकली आहे. अलीकडेच जारी झालेल्या या समीकरणानुसार, अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान नाही, तर भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जाऊ शकतो. ही बातमी वाचून क्रिकेट चाहतेही निराश झाले आहेत. कारण, चाहते भारत-पाकिस्तान संघात स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी उत्सुक होते.
असे आहे समीकरण
आशिया चषक 2023 स्पर्धेत दोन राखीव दिवस (Asia Cup 2023 Reserve Day) ठेवण्यात आले होते. यातील पहिला राखीव दिवस भारत-पाकिस्तान सामन्यासाठी होता. तसेच, दुसरा राखीव दिवस (Reserve Day) अंतिम सामन्यासाठी निश्चित केला गेला आहे. आशिया चषक 2023 सुपर- 4 (Asia Cup 2023 Super- 4) फेरीतील उर्वरित सामन्यांवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे हे सामने रद्द झाले, तर सर्व संघांना समान गुण दिले जातील.
No more reserve days in Asia Cup 2023.
If all the remaining Super 4 matches washed out – India will play Sri Lanka in the Final on Sunday. pic.twitter.com/yKU9h2396f
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 12, 2023
असे झाले, तर भारतीय संघाचे 4 गुण होतील. तसेच, पाकिस्तान आणि श्रीलंका संघाचे 3-3 गुण होतील. मात्र, भारताविरुद्ध मिळालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानचा नेट रनरेट मायनस (-1.892) झाला आहे. श्रीलंकेचा नेट रनरेट (+0.420) पाकिस्तानच्या तुलनेत खूप चांगला आहे. अशात अंतिम सामन्यासाठी श्रीलंका संघ पात्र ठरू शकतो. असे झाले, तर अंतिम सामना भारत- श्रीलंका संघ अंतिम सामन्यात आमने-सामने दिसू शकतात.
भारत-श्रीलंकेची आशिया चषकातील आकडेवारी
आशिया चषकातील भारत आणि श्रीलंका संघाच्या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं, तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 19 सामने खेळले गेले आहेत. या 19 सामन्यांपैकी 9 सामने भारताने जिंकले आहेत. तसेच, श्रीलंकेने 10 सामन्यात बाजी मारली आहे. (asia cup 2023 final match will be held between india and sri lanka know the equation)
हेही वाचा-
भारताने पाकिस्तानच्या नांग्या ठेचताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पराकोटीचा आनंद, ट्वीट करत म्हणाले…
श्रीलंकेविरुद्ध खेळणार का? पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकल्यानंतर खुद्द विराटनेच केला खुलासा