भारतीय संघ आशिया चषक 2023 स्पर्धेतील आपले अभियान 2 सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील हा सामना श्रीलंकेच्या कँडी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याच्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले की, राहुल भारताच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. यासोबतच द्रविडने भारताच्या सर्वात मोठ्या समस्येविषयीही मौन तोडले.
काय म्हणाला द्रविड?
खरं तर, भारतीय संघाने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळली होती. यामध्ये संघात अनेक प्रयोग पाहायला मिळाले होते. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्या या प्रयोगांमुळे त्याच्यावर जोरदार टीकास्त्र डागण्यात आले होते. तसेच, आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि आर अश्विन यांनाही बाहेर काढल्याच्या निर्णयामुळे चाहते निराश झाले होते.
अशात आशिया चषकापूर्वी द्रविडने भारताची सर्वात मोठी समस्या चौथ्या क्रमांकाच्या जागेविषयी मोठे भाष्य केले. माध्यमांशी बोलताना द्रविड म्हणाला की, “लोक संघातील प्रयोगाबाबत खूप बोलतात. मात्र, 18-20 महिन्यांपूर्वीही मी सांगू शकत होतो की, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी कोण उमेदवार होता. हे नेहमी केएल राहल, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्ये होते. मात्र, दुर्दैवाने ते सर्वजण एकाच वेळी दुखापतग्रस्त झाले.”
चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे मोठे दावेदार बऱ्याच काळापासून दुखापतग्रस्त
खरं तर, रिषभ पंत (Rishabh Pant) मागील वर्षीच्या अखेरीस कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्या गुडघ्याची सर्जरी झाली होती. तसेच, तो सातत्याने एनसीएमध्ये रिऍब प्रक्रियेतून जात राहिला. आता तो फिट होण्यासाठी दररोज जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.
तसेच, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यावर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतला नव्हता. मात्र, तो आता पूर्णपणे फिट आहे आणि संघाला आशिया चषक 2023 स्पर्धेत मजबूती देताना दिसेल. केएल राहुल हादेखील आयपीएलदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो मैदानापासून बाहेर होता. त्याला आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी ताफ्यात सामील केले गेले आहे. मात्र, सुरुवातीच्या दोन सामन्यांना तो मुकू शकतो. (asia cup 2023 head coach rahul dravid big statement on team india number 4 position know here)
हेही वाचलंच पाहिजे-
‘पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा खूपच भारी, रोहित-विराटची तर…’, पाकिस्तानी क्रिकेटरचे बडेबोल
केएल राहुलबद्दल धक्कादायक ब्रेकिंग! कोच द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, ‘Asia Cup 2023मधील…’