भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर-4 फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. 4 सप्टेंबर रोजी नेपाळ संघाला 10 विकेट्सने पराभवाची धूळ चारल्यानंतर भारताने सुपर 4 फेरी गाठली. आता 10 सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आशिया चषक सुपर-4 फेरीतील सामन्यात आमने-सामने असतील. या सामन्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे.
ठिकाणात झाला बदल
आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) कोलंबो येथे सातत्याने होत असलेल्या पावसामुळे सुपर-4 (Super-4) फेरीतील सामने दुसऱ्या ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या दोन्ही साखळी सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे हा मोठा निर्णय घेतला गेला आहे. खरं तर, कोलंबो (Colombo) येथील आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये 9 सप्टेंबर रोजी सामने खेळले जाणार होते, जे आता हंबनटोटा (Hambantota) येथे खेळले जाणार आहेत. आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील अंतिम सामनाही हंबनटोटा येथेच खेळला जाणार आहे. हंबनटोटा स्टेडिअम आता 9, 10, 12, 14 आणि 15 सप्टेंबर रोजी सुपर- 4 फेरीतील 5 सामन्यांचे आयोजन करणार आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
Super 4 matches of the Asia Cup will happen at Hambantota. [Dainik Jagran] pic.twitter.com/3iIPB4uIDR
— Johns. (@CricCrazyJohns) September 4, 2023
राखीव दिवसही ठेवला
अशात आणखी एक बातमी समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, जर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सुपर- 4 फेरीतील सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला, तर यासाठी राखीव दिवसही ठेवला गेला आहे. जर हा सामना 10 सप्टेंबर रोजी खेळला गेला नाही, तर 11 सप्टेंबर रोजी खेळवला जाील. तरीही हंबनटोटा येथील हवामान सध्या चांगले असल्याचे बोलले जात आहे.
भारताचा सामना 12 सप्टेंबरलाही
भारतीय संघाला सुपर- 4 फेरीत 10 आणि 12 सप्टेंबर रोजी सामने खेळायचे आहेत. भारत 10 तारखेला पाकिस्तानविरुद्ध भिडेल, तर 12 सप्टेंबर रोजी ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघासोबत भारताचा सामना होईल. त्यानंतर 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा सामना ब गटातील अव्वल संघासोबत होईल.
साखळी फेरीत पाऊस बनलेला खलनायक
भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) संघात 2 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात पाऊस खलनायक बनला होता. या सामन्यात फक्त भारतालाच फलंदाजी करता आली होती, तर पाकिस्तानला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. सातत्याने पाऊस पडल्यामुळे अखेर सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना 1-1 गुण दिला गेला. यानंतर नेपाळविरुद्धच्या साखळी सामन्यातही पावसाने खेळ खराब केला. या सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजी केली, पण नंतर डकवर्थ लुईस नियमानुसार, सामन्याचा निकाल लागला. हा सामना भारताने 10 विकेट्सने जिंकला. तसेच, सुपर-4 फेरीचे तिकीट मिळवले. (asia cup 2023 india vs pakistan super 4 match 10 september reserve day rule)
महत्त्वाच्या बातम्या-
नेपाळविरुद्ध 10 विकेट्सने विजय, तरीही रोहित नाखुश; म्हणाला, ‘अशाने आम्ही विश्वचषकच काय आशिया चषकही…’
विश्वचषक संघातून शार्दुल अन् अय्यरची हाकालपट्टी, पाहा माजी दिग्गजाने कोणत्या 15 खेळाडूंची केलीये निवड