श्रीलंका येथे सुरू असलेल्या आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (10 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना सुरू झाला. कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात केएल राहुल व जसप्रीत बुमराह यांनी पुनरागमन केले.
या सामन्यासाठी भारतीय संघात दोन महत्त्वपूर्ण बदल केले गेले. नेपाळविरुद्धच्या सामन्यात माघार घेतलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा पुनरागमन करत असून, तो मोहम्मद शमीची जागा घेईल. तर अखेरच्या क्षणी पाठीची दुखापत झाल्यामुळे श्रेयस अय्यर याला बाहेर व्हावे लागले. त्याच्या जागी केएल राहुल संघात आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरला.
दुसरीकडे पाकिस्तान संघाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील संघ कायम ठेवला. शाहीन, रौफ व नसीम यांच्या जोडीला मध्यमगती गोलंदाज फहिम अश्रफ खेळताना दिसेल.
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन- फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
(Asia Cup 2023 Pakistan Won Toss Against India And Elected Bowl First)
हेही वाचाच-
भारताविरुद्ध भिडण्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! वनडेतील बादशाहत संपुष्टात, ऑस्ट्रेलिया पुन्हा नंबर 1
IND vs PAK सामन्यापूर्वी रोहितसेनेला अख्तरची चेतावणी; व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ