भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत शनिवारी (2 सप्टेंबर) सुरू आहे. भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल डावाची सुरुवात करण्यासाठी आले आहेत. दोघांनी संघाला चांगली सुरुवात दिली असली, तरी पावसामुळे खेळ थांबवावा लागला आहे.
रोहित शर्मा याने 18 चेंडूत 11, तर शुबमन गिलने 8 चेंडू खेलून एकही धाव केली नाहीये. पाकिस्तानसाठी शाहीन शाह आफ्रिदी आपले तिसरे षटक टाकताना पाऊस आल्याने सामना थांबवला गेला. आफ्रिदीने 2.2 षटकात 11 धावा खर्च केल्या आहेत. तर दुसरीकडे नसीम शाह याने 2 षटकात 3 धावा केल्या आहेत
More covers in the ground, rain has arrived again. pic.twitter.com/pmXLWkVpld
— Johns. (@CricCrazyJohns) September 2, 2023
पाऊस सुरू झाल्यानंतर काहीच मिनिटात थांबला होता. मैदानी कर्मचाऱ्यांनी खेळपट्टीवर टाकलेला कव्हर्स पुन्हा काढायला सुरुवात देखील केली होती. मात्र, तितक्यात पाऊस पुन्हा सुरू झाला आणि खेळपट्टीवर कव्हर देखील पुन्हा टाकावा लागला. शनिवारी सकाळपासूनच मैदानात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. (Asia Cup 2023 Rain interrupts India vs Pakistan clash)
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन- फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
INDvPAK: महामुकाबल्यात टीम इंडियाची प्रथम फलंदाजी, अशी आहे प्लेईंग इलेव्हन
‘भारतीय संघ फक्त 2-3 खेळाडूंवर अवलंबून…’, पाकिस्तानी दिग्गजाच्या विधानाने खळबळ