---Advertisement---

‘भारतीय संघ फक्त 2-3 खेळाडूंवर अवलंबून…’, पाकिस्तानी दिग्गजाच्या विधानाने खळबळ

Virat-Kohli-And-Rohit-Sharma
---Advertisement---

कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषक 2023 स्पर्धेला कँडी येथे सुरुवात झाली आहे. मात्र, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज मोईन खान याने मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले, पाकिस्तान संघ यावेळी भारताच्या तुलनेत खूप चांगला दिसत आहे. भारतीय संघ फक्त दोन-तीन खेळाडूंवर अवलंबून आहे. या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

पाकिस्तान संघ सध्या आयसीसी रँकिंगमध्ये अव्वलस्थानी आहे. पाकिस्तानने अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत 3-0ने विजय मिळवला होता. यानंतर त्यांनी रँकिंगमध्ये अव्वलस्थान पटकावले. त्यांचे गोलंदाज आणि फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळेच पाकिस्तानचे पारडे जड मानले जात आहे.

पाकिस्तान संघ जास्त संतुलित
एका कार्यक्रमात बोलताना मोईन खान (Moin Khan) याने पाकिस्तान संघ जास्त संतुलित असल्याचे सांगितले. तो म्हणाला, “पाकिस्तानचा सध्याचा फॉर्म खूपच चांगला राहिला आहे. संघ सध्या वनडे क्रिकेट प्रकारात अव्वलस्थानी आहे. भारतीय संघाची अडचण अशी की, मागील काही काळापासून संघ कमी सातत्य राखताना दिसला आहे. संघाच्या निवडीतही सातत्य नाहीये. त्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. कधी कुणाची कामगिरी चांगली नसते, तर कधी कुणी दुखापतग्रस्त होत आहे. जसप्रीत बुमराह दीर्घ काळानंतर पुनरागमन करत आहे. त्याच्यासाठी गोष्टी सोप्या नसतील. जर दोन्ही संघांची तुलना केली, तर पाकिस्तान संघ जास्त चांगला संघ वाटत आहे. भारतीय संघ फक्त दोन किंवा तीन खेळाडूंवरच अवलंबून आहे.”

आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील तिसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात कँडी येथे खेळला जात आहे. स्पर्धेतील भारताचा हा पहिला सामना आहे. अशात भारत हा सामना जिंकून मालिकेची सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. सामन्याविषयी बोलायचं झालं, तर भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 4.2 षटकांनंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. इथपर्यंत भारताने 15 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 11 धावा केल्या आहेत, तर सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) 8 चेंडू खेळून एकही धाव न करता नाबाद आहे. (asia cup 2023 IND vs PAK Match indian team depends on only 2 3 players says this former cricketer)

हेही वाचा-
INDvPAK: महामुकाबल्यात टीम इंडियाची प्रथम फलंदाजी, अशी आहे प्लेईंग इलेव्हन
कँडीच्या स्टेडिअमवर कशी आहे भारत-पाकिस्तानची आकडेवारी? टॉस जिंकणाऱ्या संघाने काय केलं पाहिजे? घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---