रविवारी (दि. 17 सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअम येथे पार पडणाऱ्या आशिया चषक 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका संघ आमनेसामने आले. आशियातील सर्वात मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मात्र एकतर्फी लढत पाहायला मिळाली. मोहम्मद सिराज याने घेतलेल्या 6 व हार्दिक पंड्या याने घेतलेल्या 3 बळींच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेचा डाव केवळ 50 धावांवर संपुष्टात आणला.
या सामन्यात श्रीलंकन कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, तिसऱ्याच चेंडूवर बुमराहने कुसल परेराला बाद करून हा निर्णय चुकीचा ठरणार असल्याचे दाखवून दिले. मात्र, चौथ्या षटकातील पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या व अखेरच्या चेंडूवर मोहम्मद सिराज याने 4 फलंदाजांना बाद केले . त्यानंतर सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर देखील त्याने श्रीलंकेचा कर्णधार शनाका याला बाद केले. तर, कुसल मेंडीस याला बाद करुन त्याने आपला सहावा बळी मिळवला. तर हार्दिक पंड्या याने अखेरचे तीन बळी घेत श्रीलंकेचा डाव संपवला.
(Asia Cup 2023 Siraj 6fer Helps Srilanka All Out On 50)
हेही वाचा-
Asia Cup 2023: कॅप्टन रोहितने गमावला टॉस, भारताच्या 5 वाघांचे Finalमध्ये कमबॅक
भारताला भिडण्यासाठी ऑस्ट्रेलिया तयार, वनडे मालिकेसाठी संघ घोषित