आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर-4 फेरीत स्थान मिळवण्यापासून अफगाणिस्तान संघाचा मार्ग श्रीलंकेने बंद केला. स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने होते. या सामन्यात अफगाणिस्तान श्रीलंकेविरुद्ध 2 धावांनी पराभूत झाला. त्यामुळे त्यांना सुपर-4 फेरीत जागा मिळवता आली नाही. या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
काय म्हणाला शाहिदी?
अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) याने श्रीलंका संघाविरुद्धच्या पराभवावर मोठे भाष्य केले. तो म्हणाला, आशिया चषक 2023 स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध मिळालेल्या 2 धावांच्या निराशाजनक पराभवानंतरही त्याला त्याच्या खेळाडूंचा अभिमान आहे. या खेळाडूंनी मैदानावर त्यांचे पूर्ण योगदान दिले. मात्र, यावेळी कर्णधाराने चाहत्यांची माफीही मागितली.
A thriller in Lahore 😯
Sri Lanka sneak home by two runs against a spirited Afghanistan side to book a Super 4 spot in #AsiaCup2023 👊#AFGvSL | 📝: https://t.co/mGlQ6ex6uJ pic.twitter.com/XDPFbc4jvd
— ICC (@ICC) September 5, 2023
शाहिदी म्हणाला, “या पराभवामुळे खूपच निराश आहे. आम्ही चांगले आव्हान दिले. आम्ही आमचे सर्व योगदान दिले. संघ ज्याप्रकारे खेळला, त्याचा मला अभिमान आहे. मला वाटते, की आम्ही वनडे क्रिकेटमध्ये मागील दोन वर्षात चांगले क्रिकेट खेळलो आहोत.”
पुढे बोलताना शाहिदी म्हणाला, “आम्ही आताही खूप काही शिकत आहोत. आम्ही या स्पर्धेतून खूप सकारात्मक गोष्टी शिकल्या आहेत. आम्ही विश्वचषकाच्या जवळ आहोत. आम्ही इथे ज्या चुका केल्या, त्यातून धडा घेऊ आणि विश्वचषकात चांगले प्रदर्शन करू. प्रेक्षकांनी आम्हाला भरपूर पाठिंबा दिला. आम्ही त्यांना काही परत देण्याचा भरपूर प्रयत्न केला. मी त्यांच्याविषयी खेद व्यक्त करतो.”
सामन्यात काय घडलं?
श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 291 धावांचा पाऊस पाडला. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला सुपर-4 (Super- 4) फेरीत पोहोचण्यासाठी हे आव्हान 37.1 षटकात मिळवायचे होते. मात्र, त्यांचा डाव 37.4 षटकात 289 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे या सामन्यात अफगाणिस्तानचा 2 धावांनी निसटता पराभव झाला. (Asia Cup 2023 sri lanka beat afghanistan by 2 runs after match afghan captain hashmatullah shahidi says sorry to fans)
हेही वाचाच-
BREAKING । वर्ल्डकप 2023साठी ‘कांगारूं’चा 15 सदस्यीय संघ घोषित; स्टार खेळाडू बाहेर, तर ‘या’ पठ्ठ्याची एन्ट्री
ASIA CUP: सुपर 4 मध्ये भारतीय संघाविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानचा नकार? वाचा काय घडलं