---Advertisement---

तब्बल १५ वर्षांनंतर भारत करणार पाकिस्तान दौरा? ‘या’ स्पर्धेदरम्यान दोन संघात बघायला मिळू शकतात सामने

On: शनिवार, ऑक्टोबर 16, 2021 8:06 PM
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांनी राजकीय कारणास्तव बऱ्याच वर्षांपासून एकमेकांच्या देशात दौरे केलेले नाही. भारतीय क्रिकेट संघाने सन २००८ पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. यातच मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघ २०२३ मध्ये पाकिस्तानला जाऊ शकतो.

आशियाई क्रिकेट परिषदेच्या शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत पाकिस्तानला २०२३ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक भारतात आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान संघ या काळात भारतात येईल. येत्या २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये टी -२० विश्वचषक स्पर्धेत लढत होणार आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानला आशिया चषकाच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीलंका पुढच्या वर्षी २०२२ मध्ये आशिया चषकाचे यजमानपद भूषवेल आणि हे सर्व सामने टी -२० स्वरूपात खेळले जातील. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माहितीनुसार, पीसीबी आणि बीसीसीआय दोघांनीही या निर्णयाची पुष्टी केली आहे. त्याचे पूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.

पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा बैठकीला उपस्थित होते. नुकतेच इंग्लंड आणि न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला होता.

आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ २००८ मध्ये शेवटच्या वेळी पाकिस्तानला गेला होता. तेव्हाही फक्त एकदिवसीय सामनेच झाले होते. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन वेळा आमने-सामने आले होते. यात पाकिस्तानने एका सामन्यात विजय मिळवला तर, भारतीय संघाने एका सामन्यात विजय मिळवला. भारतीय संघाने जिंकलेल्या सामन्यात वीरेंद्र सेहवागने शानदार शतक झळकावताना ११९ धावा केल्या होत्या. याशिवाय सुरेश रैनाने ८४ धावांची स्फोटक खेळी खेळली होती.

पाकिस्तान येथे झालेल्या दोन्ही संघांमधील एकदिवसीय सामन्यातील सांख्यिकी पाहिल्यास यजमान संघाचा यात वरचष्मा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण २७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यात भारतीय संघाने ११ तर पाकिस्तानने १४ सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही. तीनही प्रकारात भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये एकूण ५३ सामने खेळले आहेत त्यात भारतीय संघाने १३ सामने जिंकले आहेत तर २१ सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

रिचर्डसनची एक विकेट पंजाबला पडली साडेचार कोटीला; तर हर्षल सर्वात स्वस्त; जाणून घ्या सविस्तर

Video: सीएसकेच्या विजयानंतर डीजे ब्रावोच्या सुरात संघसहकाऱ्यांनी मिसळला सूर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

अंबाती रायुडूने झेल घेऊनही गिल ठरला होता नाबाद; कसं ते जाणून घेण्यासाठी पाहा ‘हा’ व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---