---Advertisement---

भारताची विजयी हॅट्रीक…!!! नेपाळवर 82 धावांनी मिळवला शानदार विजय

On: मंगळवार, जुलै 23, 2024 10:57 PM
Team India (1)
---Advertisement---

यंदाच्या महिला आशिया चषकातील (Asia Cup 2024) 10वा सामना भारत विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतानं नेपाळचा 82 धावांनी दारुण पराभव केला. यंदाची आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेमध्ये खेळली जात आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघानं सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं. आता हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारत सेमीफायनल सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे.

तत्पूर्वी भारतानं टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतानं निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावून 178 धावा केल्या. त्यामध्ये सलामीवीर शफाली वर्मानं (Shafali Verma) 48 चेंडूत सर्वाधिक 81 धावा केल्या. तिच्या खेळीत तिनं 12 चौकार आणि 1 षटकार मारला. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट 168.75 राहिला. हेमलतानं 47 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. तर जेमिमाह राॅड्रीग्जनं 15 चेंडूत नाबाद 28 धावांची खेळी केली. नेपाळसाठी सीता राणा मगरनं 2 आणि कबिता जोशीनं 1 विकेट घेतली.

भारतानं दिलल्या 179 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरणारा नेपाळ संघ फक्त 96 धावाच करु शकला. नेपाळला शतकी खेळी सुद्धा गाठता आली नाही. नेपाळसाठी सीता राणा मगरनं सर्वाधिक 18 धावांची खेळी खेळली. बिंदू रावल हिनं 17 तर रुबीना छेत्री 15 आणि कर्णधार इंदू बर्माच्या 14 धावांच्या खेळीनं नेपाळ संघ केवळ 96 धावांवरतीच गारद झाला. नेपाळचा एकही फलंदाज 20 धावा देखील करु शकला नाही.

भारतासाठी फिरकीपटू दीप्ती शर्मानं (Deepti Sharma) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर राधा यादव (Radha Yadav) आणि तनुजा कनवर (Tanuja Kanwar) या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाची मध्यमगती गोलंदाज रेणुका ठाकूर सिंहनं (Rekuka Thakur Singh) सिंगनं 1 विकेट मिळवली. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार 81 धावांची आक्रमक खेळी केलेल्या शफाली वर्माला (Shafali Verma) देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘बर्थडे बॉय’ युजवेंद्र चहलसाठी पत्नी धनश्री वर्माची खास पोस्ट; म्हणाली, “मी तुझी चीअरलीडर अन् तू…” ‘
ऑल इज वेल! कर्णधारपदाच्या निर्णयानंतर खटके उडण्याऐवजी हार्दिकची सूर्यकुमारला ‘जादू की झप्पी’
आशिया चषकात पाकिस्तानचा सलग दुसरा विजय, युएईला 10 विकेट्सनं नमवले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---