आशिया चषक 2022 चार अंतिम सामना दुबई येथे खेळला गेला. युवा श्रीलंका संघाने तगड्या पाकिस्तानला 23 धावांनी पराभूत करत सहाव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला. एक वेळ पाकिस्तानच्या बाजूने चाललेला हा सामना श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगाने पलटवला. तब्बल साडेसात वर्षानंतर श्रीलंकेने कोणत्याही बहुराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू व समालोचक गौतम गंभीर अचानक चर्चेत आला.
दुबई येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. सध्या संक्रमणाच्या काळातून जात असलेल्या श्रीलंका संघासाठी हा विजय अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरला. केवळ श्रीलंका क्रिकेटच नव्हे तर श्रीलंका देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. या विजयासह देशवासीयांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम श्रीलंकन संघाने केले. देशात आर्थिक परिस्थिती खराब असली तरी, आशिया चषकात संघाला हजारो चाहते पाठिंबा देण्यासाठी युएईत पोहोचले होते. अंतिम सामन्यानंतर हे चाहते जोरदार जल्लोष करतांना दिसले. चाहत्यांच्या याच जल्लोषात भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा देखील सामील झाला.
श्रीलंकाच्या विजयानंतर गौतम गंभीर (Gautam Gambhir) मैदानात प्रसारण वाहिनीसाठी मुलाखत देत होता, त्यावेळी काही चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. गंभीरने देखील त्याला प्रतिसाद देत श्रीलंकेचा ध्वज हातात घेत आपण श्रीलंकेसोबत असल्याचे दाखवून दिले. त्याच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. काहींनी तर इतपत म्हटले आहे की, आता गंभीर श्रीलंकेत निवडणूक ही जिंकू शकतो.
Beautiful gesture by @GautamGambhir.pic.twitter.com/upSuxEc0ah
— Johns. (@CricCrazyJohns) September 11, 2022
भारतीय खेळाडूंनी श्रीलंका संघाला पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. श्रीलंकेत झालेल्या 2018 निदहास ट्रॉफी वेळी अंतिम सामन्यात हजारो श्रीलंकन चाहते भारतीय संघाला प्रोत्साहित करत होते. भारतीय संघाने अंतिम सामन्यात विजय मिळाल्यानंतर मैदानाला फेरी मारलेली. त्यावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेचा ध्वज हातात घेत, सर्व श्रीलंकन चाहत्यांचे अभिवादन केलेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वानिंदु हसरंगा मालिकावीर, तर अंतिम सामन्यात सर्वोत्तम खेळी करणाऱ्याला मिळाले ‘हे’ बक्षीस
“सट्टेबाजीमुळे टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर?” भाजप नेत्याचा सवाल
आशिया क्रिकेटवर ‘लंकाराज’! पाकिस्तानला लोळवत श्रीलंका आशियाचे चॅम्पियन