एशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना आज(28 सप्टेंबर) होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने गतविजेत्याच्या रूबाबात अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर बांग्लादेशने पाकिस्तानला चारीमुंड्याचीत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
या दोन्ही संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. यातील महत्वाच्या 5 खेळाडूंच्या कामगिरीचा घेतला हा आढावा.
1.रोहित शर्मा-
कर्णधार म्हणून रोहितने या स्पर्धेत शिखर धवनच्या मदतीने दमदार प्रदर्शन केले आहे. फॉर्मात असलेल्या रोहितला एकदा लय सापडली कि त्याला रोखने खुप अवघड आहे. एशिया कप स्पर्धेत त्याने 4 डावात 269 धावा केल्या आहेत. सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित 3 ऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत रोहितने एका शतकासह दोन अर्धशतक झळकावली आहेत.
2. शिखर धवन-
जबरदस्त फॉर्मात असलेला शिखर धवन कोणत्याही क्षणी सामन्याची दिशा बदलू शकतो. एशिया कप स्पर्धेत तो सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 4 डावात 327 धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत दोन शतक ठोकली आहेत. 82 ची सरासरी आणि 102 चा स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
3. मिस्तफिजुर रेहमान-
स्पर्धेतील सुमार सुरूवातीनंतर हा वेगवान गोलंदाज पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात चांगलाच लयीत दिसून आला. 23 वर्षीय हा वेगवान गोलंदाज भारताची डोकेदुखी ठरू शकतो. 2016 साली झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात तो बांग्लादेशच्या संघाचा तो भाग नव्हता. आता हा बांग्ला टाइगर आपले योगदान देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने या स्पर्धेत त्याने ४ डावात ८ विकेट्स घेतल्या आहेत.
4. जसप्रित बुमराह-
जर बांग्लादेशच्या संघात मिस्तफिजुर असेल भारतीय संघात बुमराह आहे. 24 वर्षीय बुमराह हा आपल्या डॉट यार्करसाठी प्रसिध्द आहे. बुमराह हा भारतीय गोलंदाजीचा कणा आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत खेळलेल्या 3 सामन्यात 3.37 च्या ईकॉनॉमीने 7 बळी मिळवले आहेत. बुमराह हा शेवटच्या षटकांत बांग्लादेशच्या फंलदाजांना अडचणीत आणू शकतो.
5. मिशफिकुर रहीम-
बांगलादेशचा माजी कर्णधार असलेला मिशफिकुर हा नेहमीच संघाचा आधार स्तंभ राहीला आहे. 31 वर्षीय रहीम हा एशिया कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने एका शतकासह 297 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याने या स्पर्धेत त्याने ४ डावात ८१.८२च्या सरासरीने २९७ धावा केल्या आहेत.
6 .रविंद्र जडेजा-
भारताच्या वन-डे संघात जखमी अक्सर पटेलच्या जागी स्थान मिळालेल्या जडेजाला तीन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. या 3 सामन्यात त्याने सात विकेट घेतल्या आहेत. त्याला एकाच सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली असून त्यात त्याने 25 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–बांगलादेशने कंबर कसली; आकडेवारी मात्र भारताच्या बाजूने
–खराब फाॅर्ममध्ये असलेल्या धोनीला गावसकरांचा सल्ला, आधी हे काम कर!
-३ तासांत फलंदाजाकडून २३ षटकार आणि १५ चौकारांची बरसात, रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला