एशिया कप (Asia Cup)२०२२च्या हंगामाची सुरूवात २७ ऑगस्टपासून होणार आहे. श्रीलंका क्रिकेट संघ यजमान असलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने युनायटेड अरब अमिराती येथे खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तान (INDvsPAK) विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेटविश्व आतूर आहे. आधीच्या हंगामांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याऱ्या खेळाडूंचा विचार केला तर भारताचा माजी कर्णधार पहिल्या स्थानावर आहे. तर सुरेश रैना दुसऱ्या स्थानावर आहे.
एशिया कपमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताने बाजी मारली आहे. माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने एशिया कपमध्ये आतापर्यंत ५ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. सुरेश रैना (Suresh Raina) याने तीन वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. यामुळे तो हा पुरस्कर जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच माजी खेळाडू नवजोत सिंग सिद्धू हे पण एशिया कपमध्ये तीन वेळा सामनावीराचे मानकरी ठरले आहेत.
विराट आणि रैना यांनी या स्पर्धेत धावांचा रतीब घालत संघाला अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. यामुळे विराटकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
एशिया कपमध्ये विराटने नेहमीच उल्लेखनीय खेळी केली आहे. त्याने या स्पर्धेच्या वनडे आणि टी२०मध्ये जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्याने वनडेमध्ये ६१.३०च्या सरासरीने ६१३ धावा केल्या आहेत. तसेच टी२० प्रकारामध्ये ७६.५च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत.
भारतीय संघात सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये विराटची पाकिस्तान विरुद्धची टी२०तील सरासरी कमालीची आहे. त्याने पाकिस्तान विरुद्ध २०१२-२०२१च्या दरम्यान ७ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ७७.७५च्या सरासरीने ३११ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराटने मोठा ब्रेक घेतला असून तो आता एशिया कपमधून संघात परतत आहे. यासाठी तयार असून चाहतेही त्याच्या मोठ्या आणि महत्वाच्या खेळीची वाट पाहत आहेत.
एशिया कपमध्ये सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार जिंकणारे खेळाडू
५ विराट कोहली*
५ सनथ जयसूर्या
५ शोएब मलिक
४ कुमार संगकारा
४ शाहीद अफ्रिदी
३ मार्वन अट्टापट्टु
३ सुरेश रैना
३ अर्जुन रणतुंगा
३ नवजोत सिंग सिद्धू
एशिया कपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! ‘डोमेस्टिक किंग’ चंद्रकांत पंडित बनले आयपीएल विजेत्या संघाचे हेडकोच
विंडीजच्या ‘या’ खेळाडूने संघासाठी एक नव्हे तर दोन विश्वचषक जिंकण्याची इच्छा केली व्यक्त
सचिनला ओळखत नव्हतो म्हणणाऱ्या अख्तरला आकडेच पाडतायेत तोंडघशी






