---Advertisement---

Asia Cup: आज पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड्स

On: शुक्रवार, ऑक्टोबर 7, 2022 9:54 AM
Indian-Women-Team
---Advertisement---

महिला आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) यांच्यात शुक्रवारी (7 ऑक्टोबर) सामना खेळला जाणार आहेत. स्पर्धेतील हा 13वा सामना सिलहेट इंटरनॅशनल स्टेडियमवर दुपारी एक वाजता खेळला जाणार आहे.  भारत-पाकिस्तान सामना असला की क्रिकेटविश्वात सर्व नजरा याच सामन्याकडे असतात. हा सामना जिंकत भारताचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यावर लक्ष असणार आहे, तर पाकिस्तान जिंकण्याच्या ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करणार आहे.

या स्पर्धेत पाकिस्तानला मागील सामन्यात थायलंडकडून पराभव पत्कारावा लागला. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. तर भारतीय संघाने या स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रीक साधली आहे. त्यामुळे गुणतालिकेत 6 गुणांसह भारतच अव्वल क्रमांकावर आहे.

टी20 क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान आतापर्यंत 12वेळा समोरा-समोर आले आहेत. त्यातील दहा सामन्यांमध्ये भारतच विजयी ठरला आहे तर पाकिस्ताने केवळ दोनदा भारताला पराभूत केले आहे. पाकिस्तानने भारताला 2016मध्ये पराभूत केले होते, त्यानंतर भारताने लागोपाठ पाच सामने जिंकले आहेत. यामुळे भारत पाकिस्ताविरुद्ध डबल हॅट्र्टीक करण्याच्या हेतूनेच मैदानात उतरणार आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2022

या स्पर्धेत हे दोन्ही संघ शेवटचे विरोधात खेळले होते. तो सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला होता. तेव्हा बिस्माह मारूफचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना 99 धावांवर गारद झाला होता. त्यानंतर भारताने 11.4 षटकातच ते लक्ष्य पार केले होते. त्यावेळी स्म्रीती मंधाना हिने अर्धशतकी खेळी केली होती. आशिया चषक 2018च्या सामन्यातही भारतानेच बाजी मारली होती. पाकिस्तान त्या सामन्यात 7 विकेट्सने पराभूत झाला होता.

या स्पर्धेत भारताने श्रीलंका, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती या संघाना पराभूत केले आहे. तसेच भारतात या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार नेटवर्क करणार आहे. यामुळे हा सामना चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: आठवीच वनडे खेळणाऱ्या संजूचा कॅप्टन कूलच्या ‘त्या’ विक्रमाला धक्का! द्रविड, पंतला टाकले मागे
‘त्याच्याकडे युवीसारखे षटकार मारण्याची क्षमता’; संजूचा जबरा फॅन झाला आफ्रिकन दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---