अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील सामना अनेक दृष्टिने ऐतिहासिक ठरला आहे. हा सामना अफगाणिस्तानच्या क्रिकेट इतिहासातील पहिला अनिर्णित सामना ठरला आहे.
ह्या सामन्यात वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि अष्टपैलू दिपक चहरला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. त्यांच्यावरच भारतीय गोलंदाजीची धुरा होती. हे दोन्ही खेळाडू देशांर्तगत स्पर्धेत राजस्थानकडून खेळतात.
राजस्थान क्रिकेट संघटनेकडून खूप कमी खेळाडू भारतासाठी खेळतात. त्यात खलील आणि चहर यांचा समावेश झाला आहे. हा दिवस आमच्यासाठी खुप आनंद देणार आहे. असे राजस्थानचे माजी रणजी स्पर्धेतील कर्णधार विनोद माथुर यांनी सांगितले.
एशिया कप स्पर्धेसाठी अहमद खलीलचा संघात समावेश होता. त्याने आपला पहिला सामना 18 सप्टेंबरला हॉंगकॉंगविरूद्ध खेळला होता. तर जखमी हार्दिक पांड्याच्या जागी संघात स्थान मिळवलेला दिपक चहरने 25 सप्टेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय वन-डे सामना खेळला.
बीसीसीआयने राजस्थान क्रिकेट संघटनेवर घातलेली चार वर्षाची बंदी काही महिन्यापुर्वी उठलेली आहे. त्यानंतर राजस्थानच्या वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यातील हे दोन गोलंदाज भारतीय संघात सामील झाल्याने आपल्याला आनंद झाल्याचे माथुर यांनी पुढे बोलताना सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
-टीम इंडियाला नडलेल्या अफगाणिस्तान संघावर कौतूकाचा वर्षाव
-Video- बाॅलिंग करेगा या बाॅलर चेंज करे, जेव्हा धोनीला राग येतो
-टीम इंडियाकडून या क्रिकेटपटूने केले वनडे पदार्पण