भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरने आपले शतकांचे शतक एशिया कप स्पर्धेत पुर्ण केले होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे हा विक्रम त्याने बांगलादेशाविरूद्धच 2012 मध्ये केला होता.
तेंडूलकरला आपले शतकांचे शतक करण्यासाठी तब्बल 33 डाव जवळ-जवळ दिड वर्षाचा कालावधी त्याला हा पराक्रम करण्यासाठी लागले होते. 16 मार्च 2012 रोजी त्याने ढाक्यात हा पराक्रम केला होता.
बहूप्रतिक्षित शतकानंतर शेर-ए-बांगला मैदानात एकच जल्लोष उडाला होता. या सामन्यात सचिनने 147 चेंडूत 114 धावांची खेळी केली होती. आपल्या खेळी दरम्यान त्याने 12 चौकार आणि एक षटकार मारला होता.
या सामन्यात सचिनने गौतम गंभीर सोबत त्याने डावाची सुरुवात केली होती. या सामन्यात भारताने 5 विकेटच्या मदतीने 289 धावा केल्या होत्या.
सचिनच्या या शंभराव्या शतकानंतरही भारताने हा सामना गमावला होता. बांगलादेशने ह्या सामन्यात 5 विकेट आणि 4 चेंडू राखत विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
–टाॅप ५- आज हे खेळाडू एशिया कपच्या अंतिम सामन्यात करु शकतात मोठा कारनामा
–३ तासांत फलंदाजाकडून २३ षटकार आणि १५ चौकारांची बरसात, रोहित शर्माचा विक्रम थोडक्यात वाचला
–एशिया कप २०१८: टीम इंडिया सातव्यांदा विजेतेपद मिळवण्यास सज्ज
–एशिया कपमधील खराब कामगिरीचा मला बळीचा बकरा बनवले गेले