---Advertisement---

संपूर्ण वेळापत्रक: असे होणार आहेत आशिया इलेव्हन विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन संघांचे सामने

---Advertisement---

बांगलादेश क्रिकेट मंडळाने शनिवारी (15 फेब्रुवारी) आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश (Asia XI vs World XI) या संघामध्ये दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामने होणार असल्याची घोषणा केली आहे. या सामन्याचे आयोजन बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त केले जात आहे. आयसीसीने त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा दिला आहे.

या स्पर्धेतील पहिला सामना 18 मार्च आणि दुसरा सामना 21 मार्चला शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम (Sher-e-Bangla National), ढाका (Dhaka) येथे पार पडणार आहे.

या सामन्यांसाठी आशियाई एकादश या संघात 5 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश असणार आहे, असे बीसीसीआयचे सहसचिव जयेश गिरोगे (Jayesh Giroge) यांनी डिसेंबरमध्ये स्पष्ट केले होते.

परंतु या 2 सामन्यांमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. आशियाई एकादश संघात पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्याचीही चर्चा आहे.

हे टी20 सामने 18 आणि 21 मार्चला पार पडणार आहेत. परंतु या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ वनडे मालिकेसाठी भारतीय दौऱ्यावर असेल. वनडे मालिकेतील तिसरा सामना आणि आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघातील पहिला सामना एकाच दिवशी म्हणजेच 18 मार्चला पार पडणार आहेत. त्यामुळे आता या सर्व गोष्टी लक्षात घेता भारताचे कोणते खेळाडू आशियाई एकादश संघाकडून खेळणार हे पहावे लागणार आहे.

असे असेल बांगलादेशमधील आशियाई एकादश विरुद्ध विश्व एकादश संघातील टी20 सामन्यांचे वेळापत्रक-

18 मार्च – पहिला टी20 सामना – सायं 6 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) –  शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका

21 मार्च – दुसरा टी20 सामना –  सायं 6 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) – शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका

https://twitter.com/Maha_Sports/status/1228644445416935424

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---